Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

मुख्यमंत्री सुंदर शाळा स्पर्धेत नागनळळी आश्रमशाळेचा गौरव

Admin by Admin
June 30, 2025
in शैक्षणिक
0
मुख्यमंत्री सुंदर शाळा स्पर्धेत नागनळळी आश्रमशाळेचा गौरव
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानांतर्गत नागनळळी येथील खाजगी अनुदानित आश्रमशाळेने उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक मिळवला आहे.
या गौरवप्राप्तीबद्दल अक्कलकोटचे  आमदार सचिन कल्याणशेट्टी, गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबळे आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पंचायत समितीच्या सभागृहात दिनांक 28 जून 2025 रोजी पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.
नागनळळी आश्रमशाळेला एक लाख रुपयांचे पारितोषिक व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी  प्राचार्य मुजावर आय.एम., मुख्याध्यापक शेख आर.जी., तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शासनाच्या परिपत्रकानुसार सर्व आवश्यक निकषांची पूर्तता करून शाळेने ही यशाची पातळी गाठली आहे. शिक्षण विभागाच्या तज्ञ पथकाने शाळेची थेट पाहणी करून मूल्यांकन केले होते.
संस्थेचे सचिव जावेद पटेल यांच्या दूरदृष्टीने कमी कालावधीत सर्व सोयी-सुविधांनी परिपूर्ण, भव्य वसतिगृह, आधुनिक प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय व प्रशस्त क्रीडांगण असलेली शाळा उभारण्यात आली आहे. या उपक्रमामुळे भटक्या आणि विमुक्त जाती-जमातीतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळत आहे, असे मुख्याध्यापक शेख आर.जी. यांनी सांगितले.
स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे सचिव जावेद पटेल यांनी मुख्याध्यापक व शाळेतील सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.
Previous Post

राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय येथे छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

Next Post

अक्कलकोट लायन्स क्लबच्या नूतन अध्यक्षपदी अभय खोबरे यांची निवड

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट लायन्स क्लबच्या नूतन अध्यक्षपदी अभय खोबरे यांची निवड

अक्कलकोट लायन्स क्लबच्या नूतन अध्यक्षपदी अभय खोबरे यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

157030
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697