सामाजिक

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा सत्कार

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे अन्नछत्र मंडळाच्या विकासात भर पडत असल्याचे मनोगत सांगली लोकसभा मतदार संघाचे खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केले. या प्रसंगी माजी गृहराज्य मंत्री आमदार (वि.प.स.) सतेज तथा बंटी पाटील हे उपस्थित होते.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे आले असता न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या उपस्थितीत विश्वस्त भाऊ कापसे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. 
यावेळी माजी नगरसेवक अश्पाकभाई बळोरगी, काका पाटील, सिद्धाराम कालीबत्ते यांच्या सह  न्यासाचे प्रवीण घाडगे, विजय माने, बाळासाहेब पोळ, शहाजी यादव, सतीश महिंद्रकर, श्रीनिवास गवंडी, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, तानाजी पाटील, राजू पवार, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, एस के स्वामी, महांतेश स्वामी, शिव स्वामी, श्रीकांत स्वामी, सचिन स्वामी, शावरेप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगनुरे, विशाल घाडगे, धनंजय निंबाळकर, राहुल इंडे, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, देवराज हंजगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button