टॉप न्यूज

ॲथलेटिक्स असोसिएशन सिनियर चॅम्पियनशिप मध्ये नागम्मा बजेनी पटकावला सुवर्ण पदक

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट तालुक्यातील सदलापूर येथील बांबू उडी खेळातील राष्ट्रीय खेळाडू कु. नागम्मा बजे हिने ॲथलेटिक्स असोसिएशन सिनियर चॅम्पियनशिप मध्ये  सुवर्ण पदक पटकाविला आहे.दिनांक २१ जून रोजी 
 शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बालेवाडी पुणे येथे झालेल्या ॲथलेटिक्स असोसिएशन सिनियर चॅम्पियनशिप मध्ये कु. नागम्मा बजे हिने बांबू उडी मध्ये सुवर्ण पदक पटकावला व ओपन नॅशनल साठी प्रवेश मिळविला आहे.  
नागम्मा बजे ही सध्या मध्य प्रदेश भोपाळ येथे घनश्याम यादव या  प्रशिक्षकांच्या हाताखाली प्रशिक्षण घेत आहे. अतिशय संघर्ष करत कु. नागम्मा बजे ही खेळाडू राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे.
 नागम्मा रविंद्र बजे हिचे आई वडील शेतकरी आहेत. आर्थिक परिस्थिती नसताना कु. नागम्मा बजे हिने बांबू उडी खेळासाठी मेहनत घेत असून तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. कु. नागम्मा बजे हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नेतृत्व करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button