शिवम चिखले युथ एशियन आर्चरी संघातील चाचणीसाठी पात्र

करमाळा ( प्रतिनिधी )- येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय,करमाळा या महाविद्यालयातील विद्यार्थी शिवम राजेंद्र चिखले याची भारतीय आर्चरी संघातील चाचणीसाठी निवड झालेल्या आहे. या स्पर्धा बांगलादेश व चीन देशात होणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड चाचणी पुढील आठवड्यात सोनीपत हरियाणा येथे होणार आहे. या निवड चाचणीसाठी महाराष्ट्राच्या संघाकडून शिवम राजेंद्र चिखले याची निवड झालेली आहे. या निवडीतून भारतीय आर्चरी संघातील खेळाडूंची निवड होणार आहे. यशस्वी विद्यार्थ्याला महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक व तालुका क्रीडा समन्वय प्रा. राम काळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थीचे अभिनंदन संस्थेचे सचिव विलासरावजी घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, कनिष्ठ विभागाचे उप प्राचार्य संभाजी किर्दाक, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.