Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अन्नछत्र मंडळाकडून गोरगरीब ‘कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे कीट वाटप

Admin by Admin
September 10, 2024
in सामाजिक
0
अन्नछत्र मंडळाकडून गोरगरीब ‘कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे कीट वाटप
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि संकल्पनेतून तालुक्यातील सराव करण्याऱ्या गोरगरीब ‘कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे कीट वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत न्यासाकडून सप्टेंबर महिन्यातील ६६ कीटचे वाटप मंगळवारी करण्यात आले.
तालुक्यातील जे पैलवान कुस्ती सरावासाठी कोल्हापूर,पुणे, सोलापूर,धाराशिव,संभाजीनगर आदि ठिकाणी आहेत अशा कुस्तीगरांसाठी न्यासाकडून गेल्या मकर संक्रांतीच्या दिवशी (जानेवारी महिन्यात) सदरचा उपक्रम सुरू करण्यात आला होता. प्रारंभी ५० जणांना किट देण्यात आले होते. 
याबरोबरच “समर्थ महाप्रसाद” सेवे बरोबरच आता तालुक्यातील गोरगरीब कुस्तीगीरांसाठी न्यासाकडून प्रसाद रुपी खुराकाचे वाटप प्रती महिन्यास करण्यात येत आहे. या कीटमध्ये कुस्तीगीरांना आवश्यक तूप, बदाम, खारीक, बडीसोप, खसखस, इलायीची, धने आदि पदार्थांचे कुस्तीगरांसाठी श्रींचा प्रसाद रुपी खुराकात या जीनंसांचा समावेश आहे. 
तालुक्यातील कुस्तीगीर हे सरावाकरिता कोल्हापूर, पुणे, सोलापूर, धाराशिव, संभाजीनगर आदि ठिकाणी कुस्तीचा सराव करीत आहेत. मात्र त्यांची गरज ओळखून तालुक्याच्या चांद्या पासून बांध्यापर्यंतच्या कुस्तीगरांचा एका विशेष टीमच्या माद्यमातून सर्वे करून तालुक्यातील ८८ पैलवानांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान याकामी महाराष्ट्र केसरी पै.मौला शेख बादोला, पै.महेश कुलकर्णी, सरफराज शेख, अतिश पवार यांचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, सौरभ मोरे, अभियंता अमित थोरात, निखिल पाटील, बाळासाहेब पोळ, गोटू माने, प्रवीण घाटगे, बालाजी कटारे, संजय गोंडाळ, एस.के.स्वामी, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
चौकट :
‘प्रसादरुपी खुराक मानांकन चाचणी कुस्ती स्पर्धा-२०२४’ चे फतेसिंह क्रिडांगण, इन्डोअर स्टेडियम येथे थाटात शुभारंभ संपन्न झाली होती.  ही तालुक्यात प्रथमच मॅटवरील कुस्ती स्पर्धा आयोजित केले होते. या स्पर्धेतील विजेते वजनी गटातील तीन असे प्रथम, द्वितीय व तृतीय मानांकित ६६ पैलवानास दरमहा कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसादरुपी खुराकाचे कीट वाटप करण्यात येत आहे.
Previous Post

गौरी सजावटीचे साहित्याचे दर दहा टक्के वाढले, स्वतः च्या कलात्मक सजावटीकडे नागरिकाचा कल वाढला

Next Post

विविध क्रीडा स्पर्धेत मंगरुळे प्रशालेच्या खेळाडूंचे यश

Admin

Admin

Next Post
विविध क्रीडा स्पर्धेत मंगरुळे प्रशालेच्या खेळाडूंचे यश

विविध क्रीडा स्पर्धेत मंगरुळे प्रशालेच्या खेळाडूंचे यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157256
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697