सोलापूर

अकलूज पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यावर कारवाई, करावी या मागणीसाठी सोलापुरात धरणे आंदोलन..!

सोलापूर, (रमेश सुरवसे); अकलूज पोलीस स्टेशनचे अधिकारी तसेच तपास अधिकारी यांची चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी शुक्रवार दिनांक 2 मे रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे
धरणे आंदोलन करण्यात आले.
सा.’बंडखोर ‘ चे संपादक तसेच बहुजन समाज आंदोलन या सामाजिक संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष गौतम भंडारे,रा:अकलूज यांनी दिनांक 2 मे रोजी एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. भंडारे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक,सोलापूर (ग्रामीण) यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अकलूज पोलीस स्टेशनमध्ये आरोपी रोहन पवार याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल असून त्यास अटक करण्यास टाळाटाळ करणारेअकलूजचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, तसेच लेखनिक पोलीस निरीक्षक गणेश निंबाळकर यांची चौकशी करून त्यांचे वर कायदेशीर कारवाई करावी. तसेच अकलूज पोलीस स्टेशन मधील गुन्हा रजिस्टर नंबर727/2024. याप्रकरणी तपास अधिकारी भानुदास निंभोरे यांनी गुन्ह्यातील आरोपीस सहकार्य केल्याबद्दल यांच्यासह इतरांवर कायदेशीर कारवाई करावी.
” बहुजन समाज आंदोलन”, या सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा..
धरणे आंदोलन दरम्यान,सा.’ बंडखोर’ चे संपादक तसेच प्रस्तुत संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष गौतम भंडारे यांना बहुजन समाज आंदोलन या सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देऊन धरणे आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुरेश कांबळे, प्रदेश सचिव रमेश सुरवसे, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष कैलास मोरे उपाध्यक्ष भारत जानराव, सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष एडवोकेट अमित कांबळे, जिल्हा उपाध्यक्षप्रा. हनुमंत आढाव, आदी उपस्थित होते.
यावेळी शिष्टमंडळाद्वारे सोलापूर जिल्हा पोलीस(ग्रामीण) जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांना निवेदन देऊन धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button