सामाजिक

जाकिर तांबोळी मित्र परिवाराकडून जयंती मिरवणूकीत ज्यूस वाटप

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) येथील
 जाकिर तांबोळी व मित्र परिवाराच्या वतीने शुक्रवार दि. १८ एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणूक मध्ये ज्यूसचे वाटप करण्यात आले. एपीआय   पवार  यांच्या हस्ते ज्यूस वाटप करण्यात आले. सदरचा कार्यक्रम हा बस स्थानकासमोर घेण्यात आला. यावेळी
 प्रमुख पाहुणे प्रकाश गायकवाड , सामाजिक कार्यकर्ते  तम्मा मामा शेळके , जाकिर तांबोळी,आरपीआय तालुका अध्यक्ष अविनाश मडिखंबे ,सोहेल  बागवान, समीर शेख  राहुल शेळके ,सद्दमस शेख ,अनिल मोरे ,ओंकार कांबळे ,स्वामीराव लोणारी , रवी कोरे , भीमा कोळी , अप्पू किनगी, अनिल लोणारी , आदम शेख रोहित जाधव आदी उपस्थित होते. जाकिर तांबोळी यांच्या या उपक्रमाचे उपस्थित भीमसैनिकांनी कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button