रा गे शिंदे महाविद्यालयाची विद्यार्थिनी वर्षा खरात हिचे आकस्मित निधन

भाषण करत असताना चक्कर येऊन व्यासपीठावर कोसळली व निधन झाले
परंडा ( प्रतिनिधी ) येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा जिल्हा धाराशिव येथील बीएससी तृतीय वर्षाची विद्यार्थिनी कु . वर्षा खरात ही महाविद्यालयात आयोजित केलेल्या निरोप समारंभ कार्यक्रमात मनोगत व्यक्त करत होती .निरोप समारंभाचा क्षण असल्याने सर्व विद्यार्थ्यांसमोर ती स्वतःचे मनोगत व्यक्त करत होती .दोन-तीन मिनिटे बोलत बोलता अचानक तिला चक्कर आल्यासारखे झाले व खाली कोसळली . तातडीने महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी तिला उचलून उपजिल्हा रुग्णालय परांडा येथे नेण्यात आले . त्या ठिकाणी डॉक्टरांनी तीची तपासणी केली व तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ कुलकर्णी यांनी तिला मृत घोषित केले . कु . वर्षा खरात ही तिच्या वर्गात सर्वात टॉपर होती हुशार होती मनमिळावू होती. तिच्या मैत्रिणीबरोबर सतत आनंदात राहायची . तिचे खूप मोठे स्वप्न होते परंतु अचानक ती या जगाचा निरोप घेऊन गेली . तिच्या जाण्याने परंडा तालुक्यातून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .तिला महाविद्यालयाच्या व संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली . यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ शहाजी चंदनशिवे प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाने कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे व महाविद्यालयातील सर्वच विभागातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .



