Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

पालकमंत्री पदाच्या माध्यमातून लोकसेवा करणेकामी स्वामींचे आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे – पालकमंत्री गोरे 

Admin by Admin
April 3, 2025
in सामाजिक
0
पालकमंत्री पदाच्या माध्यमातून लोकसेवा करणेकामी स्वामींचे आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे – पालकमंत्री गोरे 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
        धर्म, संस्कृती आणि रुढी परंपरा जपण्यात श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे योगदान राज्यात अग्रेसर असल्याचे मनोगत राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थांच्या दर्शनाकरीता सपत्निक येथे आले असता बोलत होते. याप्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व मा.नगरसेवक महेश इंगळे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे व त्यांच्या पत्नी सोनिया गोरे यांचा श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. 
यावेळी महेश इंगळे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे व सोनिया गोरे यांना श्री.स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी महोत्सवाची निमंत्रण पत्रिका देवून श्री.स्वामी पुण्यतिथी रोजी पुन्हा एकदा स्वामी दर्शनास येऊन स्वामी समर्थांचे आशिर्वाद घेण्याचीही विनवणी केली.
पुढे बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मी व माझे कुटूंब श्री स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त आहे. आज प्रथमच स्वामींच्या दर्शनाकरिता अक्कलकोटला येण्याचे भाग्य लाभल्याने आनंद झाले असल्याचे सांगून येथील प्रसन्न स्वामीमय वातावरण, स्वच्छ व सुंदर मंदिर परिसर यामुळे वटवृक्ष देवस्थान हे एक स्वामी समर्थांचे मुळ जागृत देवस्थान आहे. येथे स्वामींचा सहवास साक्षात अनुभवता आल्याचे सांगून भविष्यातही वटवृक्ष देवस्थान समितीने स्वामी भक्ती प्रचार प्रसार कार्यासोबतच धर्म, संस्कृतीच्या रुढी परंपरा नियमीतपणे जपावे असे बहूमुल्य सुचक विधान केले. तसेच आज आपण येथे पालकमंत्री पदाच्या माध्यमातून लोकसेवा करणेकामी प्रामुख्याने स्वामींचे आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे असेही मनोगत व्यक्त करून मंदीर समितीच्या कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी प्रथमेश इंगळे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजी पवार, आनंदराव तानवडे, शिवशरण जोजन, वहिदपाशा शेख, महेश हिंडोळे, मल्लिनाथ स्वामी, शिवराज स्वामी, ननु कोरबू, बसवंतराव कलशेट्टी, लखन झंपले, संतोष पाटील, राहूल शिंदे, खाजप्पा झंपले, श्रीकांत मलवे, विपूल जाधव, आ.सचिन कल्याणशेट्टी यांचे स्वीय सहायक धनंजय गाढवे, प्रा.शिवशरण अचलेर, दीपक जरिपटके, प्रसाद सोनार, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ, श्रीशैल गवंडी, स्वामीनाथ लोणारी, गिरीश पवार, महादेव तेली आदि उपस्थित होते.
Previous Post

दहिटणे येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या अध्यक्षपदी विकीबाबा चौधरी यांची निवड

Next Post

श्री सिद्धेश्वर फाउंडेशनने मागविला टँकर,  ४२ अंश तापमानामध्ये झाडे जगविण्याची धडपड

Admin

Admin

Next Post
श्री सिद्धेश्वर फाउंडेशनने मागविला टँकर,    ४२ अंश तापमानामध्ये झाडे जगविण्याची धडपड

श्री सिद्धेश्वर फाउंडेशनने मागविला टँकर,  ४२ अंश तापमानामध्ये झाडे जगविण्याची धडपड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157101
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697