Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

कास्ट्राईब रा.प.कर्मचारी संघटनेचा मंत्रालयावर धडक मोर्चा

Admin by Admin
March 16, 2025
in सामाजिक
0
कास्ट्राईब रा.प.कर्मचारी संघटनेचा मंत्रालयावर धडक मोर्चा

Oplus_16908288

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 सोलापूर ( रमेश सुरवसे ) कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने राज्य परिवहन मार्ग महामंडळातील मागासवर्गीय अधिकारी/कर्मचारी यांच्या अनेक न्याय हक्काच्या मागणीसाठी.. 1) एस.टी.कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनवाढ मिळावी यासाठी सन 2024 ते 2028 या कालावधीच्या पगार वाढीचा कामगार करार करण्यात यावा.किंवा राप.कामगारांना वेतन आयोग लागू करावा. 2) एप्रिल 2016 पासून प्रलंबित असलेला वेतन वाढीचा फरक आणि घर भाडे भत्ता वाढीचा फरक देण्यात यावा. 3) सन 2018 पासून प्रलंबित असलेला महागाई भत्त्याचा वाढीव पगार देण्यात यावा.तसेच सध्या राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे 53% महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेण्यात यावा. 4) दि.4 सप्टेंबर 2024 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मान. एकनाथ शिंदेसाहेब यांनी जाहीर केलेल्या पगारवाढीचा फरक देण्यात यावा. 5) भविष्य निर्वाह निधी (पी.एफ.) कपात करण्यात आलेल्या वर्गणीची कर्जाच्या हप्त्याची रक्कम पी.एफ.वर्गात जमा करावी. 6) एस.टी. को.ऑप.बँकेची वर्गणी, कर्जाच्या हप्त्याची रक्कम जमा करावी. 7) विमा कर्जाच्या हप्त्याची तसेच घर खरेदी हप्त्याची रक्कम जमा करावी. 8) खाजगी बसेस कंत्राटी पद्धतीने घेण्यात आल्याने चालकांना कामगिरी मिळत नाही.त्यामुळे खाजगी बसेस कंत्राटी पद्धतीने घेण्यात येऊ नये. 9) मध्यवर्ती कार्यशाळेतील कामे बाह्य संस्थेकडून करून न घेता रा.प. कामगाराकडून करून घेण्यात यावीत. 10) रा.प. कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा मोफत प्रवास पास वर्षभरासाठी देण्यात यावा.व सर्व प्रकारच्या बसेसमधून मोफत प्रवासांची सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. 11) शिस्त व आवेदन कार्यपद्धतीतील जाचक बाबींचा पुनर्विचार करून त्यात सुधारणा करण्यात याव्यात.( विशेषतः= शिक्षा करताना प्रचंड प्रमाणात दंड वसुली, वेतनवाढ रोखण्याची कार्यपद्धती , मोठ्या प्रमाणात योग्य कारणाअभावी निलंबनाची, बडतर्फीची कारवाई ) 12) महिला अत्याचारांच्या घटनामधील दोषीवर कारवाई करण्यात यावी. 13) रा.प.कामगारांना वैद्यकीय कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. 14) मागासवर्गी कर्मचाऱ्यांचा भरती मधील अनुशेष भरून काढण्यात यावा. 15) मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तात्काळ कारवाई करण्यात यावी. अशा व इतर महत्वाच्या मागण्यासाठी कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्याच्या वतीने मंगळवार दिनांक 18/03/2025 रोजी मुंबई, आझाद मैदानावरून विधान भवन मंत्रालयावर भव्य असा धडक मोर्चा निघणार आहे. या धडक मोर्चामध्ये सोलापूर शहर, जिल्ह्यामधील कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेमधील विभागीय पदाधिकारी तसेच सभासद तसेच विविध आगारांमधील पदाधिकारी व सभासद आणि अनुसूचित जाती/ जमाती व इतर मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या धडक मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सामील होऊन मोर्चा यशस्वी करावा.असे जाहीर आवाहन ” कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे ” विभागीय अध्यक्ष:- देवा साखरे आणि विभागीय सरचिटणीस:- राजाभाऊ सोनकांबळे, कोषाध्यक्ष:- विजय क्षीरसागर , कार्याध्यक्ष:- नागनाथ वाघमारे, तसेच सोलापूर आगार अध्यक्ष सुनील गायकवाड, आगार सरचिटणीस बालाजी कांबळे यांनी संयुक्तपणे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर आवाहन केले आहेत.

Previous Post

सिफा बागवान चा पहिला रोजा पूर्ण

Next Post

काव्यात्मा सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण यांचा मुलमंत्र : छोटा असो की मोठा आवाज वाढवा पण जिंदगीचे दार जोरदार ठोठवा

Admin

Admin

Next Post
काव्यात्मा सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण यांचा मुलमंत्र : छोटा असो की मोठा आवाज वाढवा पण जिंदगीचे दार जोरदार ठोठवा

काव्यात्मा सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण यांचा मुलमंत्र : छोटा असो की मोठा आवाज वाढवा पण जिंदगीचे दार जोरदार ठोठवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697