Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

काव्यात्मा सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण यांचा मुलमंत्र : छोटा असो की मोठा आवाज वाढवा पण जिंदगीचे दार जोरदार ठोठवा

Admin by Admin
March 17, 2025
in महाराष्ट्र
0
काव्यात्मा सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण यांचा मुलमंत्र : छोटा असो की मोठा आवाज वाढवा पण जिंदगीचे दार जोरदार ठोठवा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पिंपरी चिंचवड ( अशोक शिवशरण ):  . साचलेल्या विचारांच्या पाण्याला वाट करुन देणारी संस्था म्हणजे काव्यात्मा साहित्य परिषद पुणे यांचा दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त काव्यात्मा सन्मान सोहळा व काव्य जागर संमेलन मराठवाडा जनविकास संघाच्या सभागृहात शानदारपणे पार पडले . यावेळी विचारपीठावर ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण , पुरुषोत्तम सदाफुले, श्नीकांत चौगुले, महेंद्र भारती , वृक्षमित्र अरुण पवार, सविता इंगळे, प्रसिद्ध कवी अनिल दिक्षित,सुरेश वाकचौरे,महेमूदा शेख होते.
मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व वृक्षाला पाणी घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली. परिवर्तनाच्या चळवळीचा धागा पकडून ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण जीवनाचा मुलमंत्र देताना म्हणाले
छोटा असो की मोठा आवाज वाढवा
पण जिंदगी चे दार जोरदार ठोठवा…
आयुष्याचा मतितार्थ सांगत पुढे म्हणाले
,”ज्यांना कुणीच नाहीत मुले बाळे ही नाहीत,
त्यांनी त्यांच्या वंशासाठी झाडे लावावीत म्हणजे आयुष्यात निराशा पदरी पडणार नाही असा मनोदय ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण यांनी व्यक्त केला. वृक्ष स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात यातून माणसांनी छान बोध घेणे गरजेचे.आहे.चांगल्या विचारांची माणसंच छान प्रकाश निर्माण करतात यातून समाजाला छान दिशा मिळते असे पुरुषोत्तम सदाफुले यांनी अध्यक्षीय मनोगतातून सांगितले.दहा टक्के राजकारण आणि नव्वद टक्के समाजकारण करणारे वृक्षमित्र अरुण पवार म्हणाले, “आयुष्याची किंमत करायची असेल तर वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात केली पाहिजे तेव्हाच आयुष्याचा प्रवास अधिक प्रमाणात सुखकर होईल आणि माणसाला छान सुखाचा अनुभव कायम घेता येईल.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीमत्वाचा पुरस्कार देऊन म भा. आणी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात अनुक्रमे कवयित्री शोभाताई जोशी( काव्यसाधना जीवन गौरव पुरस्कार) ,सुहास घुमरे (गझलकार प्रकाशदादा बनसोडे पुरस्कार),कवी किसन म्हसे ( काव्य प्रतिभा पुरस्कार), कवी जितेन सोनवणे (शब्दप्रभू काव्य पुरस्कार), अरविंद सगर( गझल काव्य विशेष सन्मान पुरस्कार), विजय जाधव (काव्यात्मा जनजागृती सेवा पुरस्कार), कामुदास चव्हाण(कर्तव्यदक्ष सुरक्षारक्षक पुरस्कार), अण्णा जोगदंड (कै. बाळासाहेब भारदे समाजभूषण पुरस्कार), ज्ञानेश्वर किर्दंत (महात्मा ज्योतिबा फुले समाज भूषण पुरस्कार),जाकीर लतिफ मुलानी (काव्यात्मा श्नमप्रतिष्ठा पुरस्कार) , राहूलदादा जाधव(काव्यात्मा साहित्य सेवा दर्पण पुरस्कार)
आणि शरद काणेकर ( काव्यात्मा साहित्य सेवा दर्पण पुरस्कार) . यानंतर काव्य जागर संमेलन प्रसिद्ध कवी अनिल दिक्षित यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. माणसा माणसाला जोडून ठेवण्याचे सामर्थ्य कवितेत असते म्हणून कविता ही समाज कल्याणाच्या हिताचा कायम विचार करत असते असा भावार्थ अनिल दिक्षित यांनी अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त करताना काव्य प्रतिभा यातून वास्तवाची जाणीव करुन देत म्हणाले
एका एका आकाचा
एक एक बोका असतो
आकापेक्षा बोक्याचाच
सगळीकडे ठेका असतो

प्रेम हे आपले वाढले पाहिजे
आपल्याला पुन्हा भेटले पाहिजे
जन्म हा लाभला भाग्य हे आपले
सोबती लाभले चांगले चांगले
सोबतीने पुढे चालले पाहिजे
आपल्याला पुन्हा भेटले पाहिजे
सुंदर आयुष्याची कविता मानवतेची नाळ जोडून ठेवते म्हणून मानव जीवनाचे सार्थक होते असा भावार्थ अनिल यांनी मनोगतातून व्यक्त केला.
विविध भागातून आलेल्या कवींनी दमदार कविता सादर केल्या यात दादाभाऊ ओव्हाळ, राधाबाई वाघमारे,उमेंद्र बिसेन,संजय देशमुख, पांडुरंग बाणखेले, जयश्रीताई श्नीखंडे,भगवान गायकवाड, योगिता कोठेकर, प्रतिमा काळे, धनंजय इंगळे, अशोक वाघमारे , अरुण घोडके, सुनिता घोडके,गौतम घोडके, लक्ष्मण शिंदे,बबन चव्हाण, अशोक सोनवणे,संदीप जाधव , देवेंद्र गावंडे इत्यादी.या कार्यक्रमात अरुण गराडे, प्राचार्य डॉ.पांडूरंग भोसले
हजर होत्या. या कार्यक्रमाच्या संयोजनात सुरेखा हारे , संगिता जोगदंड, दत्तूभाऊ ठोकळे,संजय साळुंखे,महेश क्षिरसागर आणि मराठवाडा जनविकास संघाच्या कार्यकर्ते यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आत्माराम हारे यांनी केले, सुत्रसंचालन दिनेश भोसले यांनी केले व या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन संजय साळुंखे यांनी केले.

Previous Post

कास्ट्राईब रा.प.कर्मचारी संघटनेचा मंत्रालयावर धडक मोर्चा

Next Post

भाजप, महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे. ज्याप्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते, त्याचप्रमाणे भाजपला दंगलीची गरज आहे : खासदार प्रणिती शिंदे

Admin

Admin

Next Post
भाजप, महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे. ज्याप्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते, त्याचप्रमाणे भाजपला दंगलीची गरज आहे : खासदार प्रणिती शिंदे

भाजप, महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे. ज्याप्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते, त्याचप्रमाणे भाजपला दंगलीची गरज आहे : खासदार प्रणिती शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157100
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697