Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा ९ मार्चपासून

Admin by Admin
March 8, 2025
in महाराष्ट्र
0
संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा ९ मार्चपासून
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पुणे ( अशोक शिवशरण )जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमनाला येत्या १६ मार्च रोजी अर्थात तुकाराम बीजेच्या दिवशी ३७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
श्री जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान, श्री क्षेत्र देहू यांनी हा मान पुणे जिल्ह्यास दिला आहे. श्री क्षेत्र भंडारा डोंगर संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद आणि हभप छोटे माऊली महाराज कदम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी जोपशेठ पवार, जगनाथ नाटक पाटील उपस्थित होते.
श्री क्षेत्र आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्वर्यू हभप मारूतीबाबा कुऱ्हेकर महाराज आणि वारकरी रत्न हभप ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज यांच्या नेतृत्त्वाने गाथा पारायण सोहळा येत्या ९ मार्च ते १७ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. भंडारा डोंगराच्या पायथ्याला हा सोहळा होईल. या पारायण सोहळ्यासाछी १५ हजार भाविक वाचक म्हणून सहभागी होणार असून मुख्य सोहळा तुकाराम बिजेच्या दिवशी होणार आहे. या दिवशी राज्यभरातून सुमारे तीन लाख भाविक गाथा पारायण सोहळ्यात सहभागी होणार आहेत. जवळपास १०० एकर जागेवर हा सोहळा होणार आहे.
अयोध्येच्या मंदिरासारखे भंडारा डोंगरावरील संत तुकाराम महाराज यांचे मंदिर तयार होत आहे. रामासम तुकाराम असे मानून जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे कार्य सर्वांना परिचित व्हावे, म्हणून या मंदिराचे काम सुरू आहे. या मंदिर उभारणीसाठी जवळपास २०० कोटी रुपये खर्च येत आहे. अयोध्येच्या राम मंदिर उभारणीतीलच काही कारागीर भंडारा डोंगरावरील या मंदिरासाठी देखील काम करत आहेत.
या सोहळ्यामध्ये दररोज ५००० गाथा वाचक सहभागी होतील. रोज १००० टाळकरी असतील. २५ मृदंगवादकांचा समावेश असेल. येत्या ९ मार्च पासून हा सोहळा सुरू होणार आहे. रोज सकाळी अकरा वाजता आणि सायंकाळी सहा वाजता कीर्तन होईल.

असा आहे कीर्तन सोहळा…

९ मार्च – हभप रवींद्र महाराज ढोरे (स. ११), हभप मुकुंदकाका जाटदेवळेकर (सायं. ६)
१० मार्च – हभप सागर महाराज शिर्के (स. ११), हभप पोपट महाराज कासारखेडेकर (सायं. ६)
११ मार्च – हभप दशरथ महाराज मानकर (स. ११), हभप एकनाथ महाराज सदगीर (सायं. ६)
१२ मार्च – हभप शिरीष महाराज मोरे (स. ११), हभप चंद्रशेखर महाराज देगलूरकर (सायं. ६)
१३ मार्च – हभप चंद्रकांत महाराज वांजळे (स. ११), हभप महादेव महाराज राऊत सायं. ६)
१४ मार्च – हभप नितीन महाराज काकडे (स. ११), हभप बंडातात्या कराडकर (सायं. ६)
१५ मार्च – हभप चैतन्य महाराज देगलूरकर (स. ११), हभप रामभाऊ महाराज राऊत (सायं. ६)
१६ मार्च – हभप ज्ञानेश्वर माऊली कदम (स. ११), हभप जयवंत महाराज बोधले (सायं. ६)

बीजेला तीन लाख मांडे होणार…!
तुकाराम बीजेच्या दिवशी तीन लाख मांडे केले जाणार आहेत. मुळशीतील विविध गावांमधून पाच लाख पुरणपोळीचा प्रसाद दिला जाणार आहे. एक लाख भाकरी आणि विविध भागांमध्ये केली जाणारी वेगवेगळ्या प्रकारची आमटी येथे अन्नदानात उपलब्ध असेल. बीजेच्या दिवशी सकाळी साडेनऊ ते अकरा या वेळेत वैकुंठ स्थानक, तुकाराम महाराजांचा वाडा, संस्थान देहू, भंडारा डोंगर संस्थान, भामचंद्र डोंगर, येथे हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे.

दिंडी सोहळा आणि वैशिष्ट्ये…
या सोहळ्यानिमित्त ८ मार्च रोजी दुपारी तीन वाजता श्री क्षेत्र भंडारा डोंगर भव्य दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या दिंडीमध्ये ३७५ धर्मध्वजधारी, ३७५ कलशधारी, ३७५ तुळशीधारी, ३७५ कीर्तनकार, ३७५ टाळकरी, ३७५ मृदंगसेवक ३७५ ब्रह्मवीणाधारी, ३७५ चोपदार यांचा समावेश असेल. दिंडीमध्ये पाच किलो चांदीच्या पादुका ठेवण्यात येणार आहेत. श्री क्षेत्र देहू येथून भंडारा डोंगरापर्यंत ही दिंडी निघणार आहे. तेथे पादुकांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे.

येथे एक शीत दिधल्या अन्न। होय कोटी कुळाचे उद्धरण।
या सप्ताहामध्ये अन्नदान फार मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्यामुळे या अन्नदानाच्या पवित्र कार्यात मोठ्या प्रमाणावर नागरिक सहकार्य करू शकतात. श्री जगद्गुरू तुकोबाराय परिचारक संस्था या नावाने पंजाब नॅशनल बँकेमध्ये असलेल्या खात्यावर मदत करता येईल. हा योग पुन्हा २५ वर्षांनीच येणार आहे. समस्त मावळ, मुळशी, खेड, हवेली, शिरुर, पुरंदर, भोर, वेल्हा, तालुके, पिंपरी चिंचवड तथा पुणे महानगर पालिकेतील गावे व नगरे, समस्त पुणे जिल्हा यांच्यासाठी आयोजकांनी आवाहन केले आहे.

Previous Post

संविधान सन्मान संमेलनाचे पुण्यात आयोजन

Next Post

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदी हार्दिक बियाणी यांची निवड

Admin

Admin

Next Post
सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदी हार्दिक बियाणी यांची निवड

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदी हार्दिक बियाणी यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157100
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697