देश - विदेश
ओंकार सर्जेला सदन कॅलिफोर्निया विद्यापीठाची एम. एस. पदवी

सोलापूर ( प्रतिनिधी ) : सोलापूरचा युवक ओंकार सिद्धार्थ सर्जे याने अमेरिकेतील सदन कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतून इंजिनिअरिंग मॅनेजमेंट मध्ये एम. एस. ही उच्चपदवी संपादन केली. गेल्या दोन वर्षापासून तो या यूनिवर्सिटीमधून शिक्षण घेत होता. काल झालेल्या पदवीदान समारंभात कुलगुरू डॉ. यान्निस यॉर्टसस यांच्या हस्ते त्याला पदवी प्रदान करण्यात आली.
श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच उद्योजक सिद्धार्थ सर्जे यांचा ओंकार हा चिरंजीव आहे. संत साहित्याचे अभ्यासक, तबलावादक, शिक्षक डॉ. अनिल सर्जे तसेच सुनील सर्जे यांचा तो पुतण्या आहे. ओंकारचे सुरुवातीचे शिक्षण इंडियन मॉडेल स्कूल, वालचंद कॉलेज, सोलापूर, मॉडर्न इंजीनियरिंग कॉलेज पुणे येथे झाले. तो उत्तम हार्मोनियम वादक, गायक असून कराटेमधे ब्लॅक बेल्ट झाला आहे.
संकष्ट चतुर्थीच्या दिनी दि १६ मे २०२५ रोजी ही पदवी मिळाली आहे.
त्याच्या या यशाबद्दल काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी आशीर्वाद दिला आहे. सोलापूरच्या सुपुत्राच्या यशाबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.



