वंचित बहुजन आघाडीतर्फे पत्रकार स्वामीराव गायकवाड व राजेश जगताप यांचा सत्कार

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारिणी सदस्य पदी निवड झाल्याबद्दल पत्रकार स्वामीराव गायकवाड तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार राजेश जगताप यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडी कडून स्वामीराव गायकवाड व राजेश जगताप यांचा फेटा बांधून शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांनी पत्रकार स्वामीराव गायकवाड व राजेश जगताप यांच्या सन्मानाबद्दल यावेळी अभिनंदन व्यक्त केले तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष विशाल ठोंबरे , सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य प्रवक्ता रवी पोटे , ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार जगदाळे , पत्रकार रमेश भंडारी , वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष बबन गायकवाड, माणिक गायकवाड आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.