अक्कलकोट (प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारणी सदस्य पदी निवड झाल्याबद्दल पत्रकार स्वामीराव गायकवाड यांचा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान अक्कलकोट कडून सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सेवानिवृत्त प्राध्यापक परमेश्वर अरबाळे सचिव नवनाथ धस यांच्या हस्ते स्वामीराव गायकवाड यांचा फेटा बांधून , शाल, श्रीफळ ,पुष्पगुच्छ , हार घालून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार जगदाळे ,पत्रकार राजेश जगताप , पत्रकार रेवनसिद्ध पुजारी , मोहन बंदीछोडे , निरंजन माने आदी उपस्थित होते.