सामाजिक

डॉ.आंबेडकर उद्यान व संविधान भवन कृती समितीतर्फे अभिवादन

 

सोलापूर ( रमेश सुरवसे ) डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान व संविधान भवन कृती समिती, सोलापूर यांच्यावतीने विश्वभूषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्यास कृती समितीचे सरचिटणीस राजरत्न फडतरे आणि कार्याध्यक्ष राजाभाऊ सोनकांबळे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.डॉ.आंबेडकर उद्यान व संविधान भवन कृती समितीचे संपर्कप्रमुख गौतम मसलखांब, कोषाध्यक्ष दत्ताजी गायकवाड, उपाध्यक्ष धर्मेंद्र चंदनशिवे, साबळे सर, मेजर साबळे, यांच्यासह सोलापूर महानगरपालिकेचे माजी उप महापौर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते प्रमोद गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान व संविधान भवन कृती समितीमधील पदाधिकारी तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button