Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

परंडा येथे ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडी द्वारा स्वाक्षरी मोहीम जनआंदोलन सुरु

Admin by Admin
December 5, 2024
in राजकीय
0
परंडा येथे ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडी द्वारा स्वाक्षरी मोहीम जनआंदोलन सुरु
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

परंडा ( फारुक शेख )परंडा :वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्या टप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर पर्यंत राज्यात ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.२००४ पासून ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.ईव्हीएम च्या विरोधात न्यायालयीन लढाई सुद्धा ते लढत आहेत.पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ईव्हीएम वापरामधील अनेक घोळ त्यांनी माध्यमासमोर मांडले आहेत. ईव्हीएम च्या विरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे.
२४३परंडा विधानसभा मतदारसंघा मध्ये वंचित बहुजन आघाडी च्या वतीने परंडा शहरातील किल्लारोड मंडईपेठ येथून स्वाक्षरी मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली.सर्व मतदारांनी या मोहिमेत सहभागी होऊन ईव्हीएम ला हद्दपार करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के ,परंडा शहराध्यक्ष किरण बनसोडे ,महासचिव राहुल पवार ,विलास जाधव ,रणधीर मिसाळ ,प्रफुल चौतमहाल ,अरुण सोनवणे ,युवा अध्यक्ष रणवीर निकाळजे युवा नेते फिरोज तांबाळी ,अरीफ पठाण ,धनंजय चौधरी ,भाऊसाहेब सुभाष टकले आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

वारकरी सेवा संघाकडून आळंदीत स्वच्छता अभियान

Next Post

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवास – जीवन, इतिहास आणि कार्य

Admin

Admin

Next Post
बाबासाहेबांचे विचार अन् आजची लोकशाही

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवास - जीवन, इतिहास आणि कार्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157253
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697