राजकीय
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी घोषित

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने महाराष्ट्रातील 48 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केलेली आहे.
यामध्ये अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे. भाजपासह इतर पक्षाचे उमेदवार घोषित करण्यात आले होते. पण काँग्रेस पक्षाचा अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील उमेदवार घोषित होण्यास विलंब लागत असल्याने काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्याचें उमेदवारी कडे लक्ष लागले होते. अखेर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने महाराष्ट्रातील 48 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा गुरुवारी रात्री केलेली आहे. यामध्ये अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी घोषित करण्यात आली.
