Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट तालुक्यात भाजपा, काँग्रेस, रासप , वंचित आघाडीच्या उमेदवारांकडून ग्रामीण भागात  प्रचाराचा धडाका !

Admin by Admin
October 23, 2024
in राजकीय
0
अक्कलकोट तालुक्यात भाजपा, काँग्रेस, रासप , वंचित आघाडीच्या उमेदवारांकडून ग्रामीण भागात  प्रचाराचा धडाका !

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

 अक्कलकोट ( स्वामीराव गायकवाड ) अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये काँग्रेस, भाजपा, वंचित बहुजन आघाडी , रासपच्या उमेदवारांकडून विधानसभा निवडणुकीतील प्रचारावर  भर देण्यात आला आहे. सर्वच उमेदवारांनी गाव भेट दौऱ्यावर भर दिला असून विधानसभा निवडणुकीतील प्रचाराची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
 २५० ,अक्कलकोट विधानसभा मतदार संघात भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी ,काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोषकुमार इंगळे , राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार सुनील बंडगर यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील विविध गावात प्रचारासाठी जोर दिला आहे. भाजपाने विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. आमगार सचिन कल्याणशेट्टी यांनी विकास कामांच्या मुद्द्यावर भर देत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेस पक्षाकडून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना उमेदवारी मिळाली असल्याने त्यांनी विविध गावात प्रचाराचा धडाका उडवून दिला आहे. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी ग्रामीण भागात आज पर्यंत त्यांनी मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या बळावर मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर यांना उमेदवारी देऊन अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले आहे. सुनील बंडगर यांनी ग्रामीण भागातील प्रचारावर जोर दिला आहे. त्यांनी धनगर समाजाचे आरक्षण तसेच स्थानिक मुद्द्यांवर भर देत राजकीय वातावरण पेटविले आहे. वंचित बहुजन आघाडीचे कर्जाळ येथील उमेदवार संतोषकुमार इंगळे यांना उमेदवारी देऊन अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून संधी दिली आहे. वंचित चे उमेदवार संतोषकुमार इंगळे यांच्या प्रचारासाठी वंचितचे पदाधिकारी कार्यकर्ते हे ग्रामीण भागात प्रचारावर जोर देत आहेत. वंचित बहुजन आघाडी कडून भाजपा आणि काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात येत असून स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर भर दिला जात आहे.  भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आपल्या  प्रचाराचा शुभारंभ हा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ तसेच  श्री मल्लिकार्जुन देवस्थान , हैद्रा येथील हजरत खाजा सैफुल मुलुख चिस्ती यांचे दर्शन घेऊन केला. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दुधनी मैंदर्गी वागदरी हैद्रा , नागणसूर , तोळनूर चुंगी कुरनूर मोठ्याळ हालहल्ली, बऱ्हाणपूर डोंबरजवळगे बोरेगाव दर्शनाळ पितापूर नन्हेगाव सुलतानपूर चपळगाववाडी सिंदखेड आदी गावात कॉर्नर बैठक , कार्यकर्त्यांची बैठक घेऊन प्रचार करण्यात आला. काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला. हैद्रा येथे जाऊन हजरत खाजा सैफुल मुलुख चिस्ती यांचे दर्शन घेतले. यावेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी  हैद्रा , उडगी , बासलेगाव गळोरगी नागनहळळी मातनहळळी  नागणसूर आदींसह विविध गावात प्रचार दौरा करून कॉर्नर सभा घेऊन मतदारांशी संवाद साधला. राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार सुनील बंडगर यांनी सुलेरजवळ , केगाव, केगाव खुर्द कोरसेगाव तडवळ मुंढेवाडी कुमठे धारसंग आळगे शेगाव , खानापूर , अंकलगे , कल्लकर्जाळ , बादोले कुरनूर , सांगवी ,वागदारी ,सापळा , पालापूर आदींचा विविध गावात भेट देऊन मतदारांशी संवाद साधला आहे .सुनील बंडगर यांनी ग्रामीण भागातील प्रचारावर जोर दिल्याने त्यांना प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. वंचित आघाडीचे उमेदवार संतोषकुमार इंगळे यांच्या प्रचारार्थ पदाधिकारी व कार्यकर्ते हे ग्रामीण भागात प्रचार करत असून वंचित आघाडीला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. संतोषकुमार इंगळे यांनी विविध गावात प्रचार दौरा करून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे ,भाजपाचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी , वंचित चे उमेदवार संतोषकुमार इंगळे, रासप चे उमेदवार सुनील बंडगर यांनी ग्रामीण भागात प्रचारासाठी कंबर कसल्याने मतदारांमध्ये याची चर्चा रंगली आहे.
Previous Post

मुथा अबॅकस व वैदिक मॅथस अकॅडमी संचालिका प्रा. ज्योती मुथा यांचा नारी शक्ती गौरव पुरस्काराने सन्मान

Next Post

कुठे थांबायचे नक्की झालं तो संतुष्ट

Admin

Admin

Next Post
कुठे थांबायचे नक्की झालं तो संतुष्ट

कुठे थांबायचे नक्की झालं तो संतुष्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157101
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697