राजकीय
दक्षिणमधून महादेव कोगनुरे मनसेचे उमेदवार

सोलापूर ( प्रतिनिधी ): दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून महादेव कोगनुरे हे मनसे पक्षाकडून लढणार असून त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. महादेव कोगनुरे आता काँग्रेस पक्षाला रामराम करत मनसेच्या रेल्वे इंजिनमध्ये बसणार असल्याने दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात बहुरंगी लढत रंगणार आहे.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघासाठी इच्छुक असलेले एम.के. फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे हे गेल्या दोन वर्षांपासून अनेक विधायक कामे करीत आहेत. त्याचबरोबर मनसेने केलेल्या सर्व्हे क्षणात महादेव कोगनुरे आघाडीवर असल्याने त्यांना मनसेकडून बोलावणे आले होते. शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोगनुरे यांनी भेट घेउन चर्चा केली. त्या वेळी ठाकरे यांनी कोगनुरेंना कामाला लागण्याचे आदेश दिले.
एम. के. फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे हे गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिण विधानसभा मतदारसंघात अनेक कामे करीत विकासात्मक आहेत. गोरगरिबांच्या अडचणीला धावून जाऊन त्यांना सर्वतोपरी मदत व सहकार्य करीत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कोगनुरे यांनी केलेल्या कामामुळे व थेट मतदारांशी असलेला जनसंपर्क ओळखून शिंदे यांनी कोगनुरे यांना लोकसभा निवडणुकीत खा. प्रणिती शिंदे यांना मदत करण्याबाबत सांगितले होते. सुशीलकुमार शिंदे यांची विनंती मान्य करून कोगनुरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात झंझावती निर्माण करून दक्षिण विधानसभा मतदारसंघ पिंजून काढून प्रणिती शिंदे यांना मदत करण्याबाबत त्यांनी मतदारांना आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला मतदारांनी प्रतिसाद देत प्रणिती शिंदे यांना दक्षिण विधानसभा मतदार संघात मताधिक्य दिले होते.
महादेव कोगनुरे दक्षिण मतदार संघामध्ये ते इच्छुक आहेत. याबाबत त्यांनी तयारीही सुरू केली आहे. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने या मतदार संघासाठी सव्र्हेक्षण केले होते. यामध्ये कोगनुरे हे आघाडीवर होते. त्यामुळे मनसेकडून त्यांना संपर्क करून बोलावून घेतले होते. शनिवारी राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थ येथे कोगनुरे यांनी भेट घेऊन मतदार संघाची माहिती दिली. त्याचबरोबर इतर चर्चा केली. शेवटी राज ठाकरे यांनी निवडणुकीसाठी कामाला लागा, असा आदेश दिला असल्याचे कोगनुरे यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. मनसेकडून दक्षिण विधानसभा मतदार संघासाठी उमेदवारी फिक्स झाल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार कोगनुरे यांनी तयारी केल्याचे सांगण्यात आले.