सामाजिक
मातोश्री लक्ष्मी शुगरचा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ संपन्न..

दिवाळीसाठी अत्यल्प दरात साखर वाटप..
अक्कलकोट ( प्रतिनिधी- ) रुद्देवाडी ता. अक्कलकोट येथील मातोश्री लक्ष्मी शुगर को जनरेशन इंडस्ट्रीज लिमिटेड कारखान्याचा बारावा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ बुधवारी पार पडला.
कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर शिवराज म्हेत्रे व इरण्णा करवीर यांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आला. यावेळी बोलताना शिवराज म्हेत्रे म्हणाले की, आगामी गळीत हंगामासाठी कारखाना प्रशासन सज्ज झाला आहे तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस देऊन सहकार्य करावे. दिवाळीसाठी ऊस पुरवठादार शेतकरी सभासदांना २१ रुपये प्रतिकिलो या दराने कारखाना स्थळावर साखर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.२५ ऑक्टोंबर ते २७ ऑक्टोबर यादरम्यान साखर वाटप करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर प्रदीप पवार,केनहेड गुरुनाथ लोहार,वर्क मॅनेजर राजकुमार लवटे,डेप्युटी केन मॅनेजर सिद्राम गुरव,चीफ केमिस्ट आनंदराव सातुसे, ऊस पुरवठा अधिकारी बाबुराव पाटील,चिप अकाउंटंट अंबादास बळ्ळा,एच आर मॅनेजर मिलिंद शिरसे,स्टोर कीपर श्रीकांत लोहार यांच्यासह सर्व अधिकारी खाते प्रमुख कर्मचारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.