शिवसेना बांधकाम कामगार सेनेकडून माजी मंत्री म्हेत्रे यांचा सत्कार

सोलापूर जिल्हा शिवसेना बांधकाम कामगार , सोलापूर जिल्हा यांच्या वतीने माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा सत्कार करण्यात आला. सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे यांच्या मार्गदर्शनाने अक्कलकोटचे माजी आमदार तथा माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे पाच जून रोजी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यानिमित्त सोलापूर जिल्हा शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हा उपप्रमुख स्वामीनाथ हेगडे यांच्या निवासस्थानी सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख महेश साठे शिवसेना महिला आघाडी जिल्हा संपर्कप्रमुख अनिता माळगे युवती सेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रियांका परांडे यांचा प्रमुख उपस्थितीमध्ये म्हेत्रे यांचा सत्कार करण्यात आला.सोलापूर जिल्हा शिवसेना बांधकाम कामगार सेना यांच्या वतीने मान्यवराचा सत्कार करण्यात आला .यावेळी शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हा प्रमुख साहेबांना तेगेळी , शिवसेना बांधकाम कामगार सेना सोलापूर जिल्हा उपप्रमुख स्वामीनाथ हेगडे शिवसेना बांधकाम कामगार सेना सोलापूर जिल्हा महिला आघाडी प्रमुख वैशाली हावनूर शिवसेना अक्कलकोट शहर उपप्रमुख वर्षाताई मेत्रे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्हा शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.