Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

उजनीच्या पाण्यावरून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात सोशल मीडियावर कार्यकर्ते ऍक्टिव्ह ! 

Admin by Admin
September 30, 2024
in टॉप न्यूज
0
उजनीच्या पाण्यावरून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात सोशल मीडियावर कार्यकर्ते ऍक्टिव्ह ! 

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणात 22 वर्षानंतर उजनी धरणातून हक्काचे पाणी आल्याने धरण भरल्याने सर्वत्र आनंदाचे समाधानाचे वातावरण आहे. उजनीच्या पाण्यावरून आता राजकीय क्षेत्रात वातावरण पेटले आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात उजनीच्या पाण्यावरून भाजपा आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सोशल मीडियावर एक्टिव्ह झाले असून दादां  अन् अण्णांमुळेच पाणी आल्याची पोस्टरबाजी सुरू झाली आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उजनीचे पाणी कोणत्या दिशेने वळणार याबाबत राजकीय क्षेत्रात चर्चा रंगली असून उजनीचे पाणी सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
 अक्कलकोट तालुक्यासह दक्षिण सोलापूर तालुक्याला बहुप्रतीक्षेनंतर हक्काचे उजनी धरणातील पाणी मिळाले आहे. तब्बल 22 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कुरनूर धरणात उजनीतून पाणी सोडण्यात आले. या पाण्यामुळे कुरनूर धरण 100% भरले आहे. तसेच कुरनूर धरण भरल्याने धरणाच्या तीन दरवाज्यातून पाणी सोडण्यात आले आहेत कुरनूर धरणाच्या पाण्यावर अक्कलकोट तालुक्यातील 51 गावांचा आणि अक्कलकोट मैंदर्गी दुधनी या नगरपालिकांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. कुरनूर धरण 100% भरल्याने नगरपालिकांसह 51 गावांचा पाणीपुरवठ्याची चिंता मिटली आहे. उजनी धरणातून कुरनूर धरणात पाणी आल्याने भाजपा सह काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी भाजपा आणि महायुतीमुळेच पाणी आल्याचे सांगून उजनीचे पाणी आम्हीच आणल्याचा दावा केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रमा दिल्याने एकरूप सिंचन योजना मार्गी लागल्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले आहे. भाजपा आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यामुळेच उजनीचे पाणी कुरनूर धरणात आल्याचा प्रचार आता सोशल मीडियावर जोर धरला आहे .भाजपा आणि महायुतीच्या नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी उजनीच्या पाण्याचे श्रेय आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना दिले आहे. भाजपाचे कार्यकर्ते हे आता सोशल मीडियावर फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम वर सक्रिय झाले आहेत. पाणीदार आमदार म्हणून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर रील्स , पोस्ट बॅनर , छोटे व्हिडिओ बनवून सोडण्यात येत आहेत .यामुळे भाजपाने कुरनूर  धरणाच्या श्रेयात आघाडी घेतल्याचे दिसत आहे .दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे सोशल मीडिया मीडियावर कुरनूर धरणाच्या पाण्यासाठी सक्रिय झाल्याचे दिसत आहेत. माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या अथक परिश्रमामुळेच कुरनूर धरणात उजनी धरणातील पाणी आल्याचे सांगत आहेत. गावोगावी बॅनरबाजी करत आहेत. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यावर फेसबुक व्हाट्सअप वर रिलीज द्वारे पोस्ट बॅनर द्वारे कुरनूर धरणात पाणी आल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभेच्या तोंडावर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे कुरनूर धरणातील पाणी श्रेयासाठी सक्रियपणे सोशल मीडियावर प्रचार करत आहेत. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात कुरनूर धरणातील पाणी हे आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा प्रमुख मुद्दा असणारा असे सध्याच्या वातावरणाकडे पाहून वाटत आहे. काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते हे अण्णा आणि दादांना सोशल मीडियावर प्रमोट करण्यासाठी एक ही संधी सोडताना दिसत नाहीत. कुरनूर धरणातील पाणी हे अण्णा की दादामुळे याची चर्चा मात्र अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात रंगली आहे. अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणात 22 वर्षानंतर हक्काचे पाणी आल्याने कुरनूर धरण भरल्याने सर्वत्र सध्या आनंदाचे वातावरण आहे. उजनीच्या पाण्यावरून आता राजकीय क्षेत्रात वातावरण पेटले आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उजनीचे पाणी कोणत्या दिशेने वळणार याबाबत मात्र राजकीय क्षेत्रात चर्चा रंगली असून उजनीचे पाणी सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

Previous Post

अक्कलकोट शहरात ऐन दसरा सणाच्या तोंडावर पाण्यासाठी शिमगा !

Next Post

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते हैद्रा येथे विविध विकास कामाचें भूमिपुजन

Admin

Admin

Next Post
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते हैद्रा येथे विविध विकास कामाचें भूमिपुजन

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते हैद्रा येथे विविध विकास कामाचें भूमिपुजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157101
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697