Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण विभागाच्या भ्रष्टाचाराच्या फेर चौकशीची मागणी:, हलगीनाद आंदोलन, केस मुंडन, अर्धनग्न, चक्री उपोषणाचे शस्त्र उपसणार

Admin by Admin
September 24, 2024
in सामाजिक
0
सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण विभागाच्या भ्रष्टाचाराच्या फेर चौकशीची मागणी:, हलगीनाद आंदोलन, केस मुंडन, अर्धनग्न, चक्री उपोषणाचे शस्त्र उपसणार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट :(प्रतिनिधी)
सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण विभागांमध्ये शासनाच्या विविध योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी. अक्कलकोट सामाजिक वनीकरण विभागाच्या कामकाजाची केलेल्या चौकशी समितीची फेर चौकशी करण्याच्या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी   सामाजिक वनीकरण कार्यालयावर हलगीनाद आंदोलन करण्यात आले.
अक्कलकोट तालुक्यात सन २०१७ ते २०२३ दरम्यान सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून झालेल्या रस्ता दुतर्फा, वृक्ष लागवड, गट लागवड, रोपवाटिका, एनटीपीसी यासह विविध शासकीय योजना अंतर्गत कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप लहुजी शक्ती सेनेने केलेला आहे. सप्टेंबर आणि डिसेंबर २०२३ मध्ये अक्कलकोट तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागातील भ्रष्टाचार तपासण्यासाठी चौकशी समितीचा दौरा दोन वेळेस झाला होता. मात्र चौकशी समितीच्या दौऱ्यात काहीही निष्पन्न झालेले नाही. या समितीने एनटीपीसीच्या विविध ठिकाणांना भेटी देऊन चौकशी केली नाही. स्थळ पाहणी नि:पक्षपातीपणे केली असती तर भ्रष्टाचाराचा भस्मासुर सापडला असता. त्यामुळे चौकशी समितीच्या भोंगळ कारभाराची सखोल चौकशी करून शासनाने पुन्हा नव्याने फेर चौकशीची  करण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष वसंत देडे यांनी केलेली आहे. यावेळी बालाजी घोडके जिल्हा कार्याध्यक्ष परसू ऐवळे दक्षिण तालुका अध्यक्ष सोमनाथ कसबे मोहोळ तालुका अध्यक्ष अजय मोहिते सोलापूर शहर युवक अध्यक्ष भैया काळे मोहोळ युवक अध्यक्ष  विकास डोलारे शहर उपाध्यक्ष श्याम रनधीरे आकाश डोलारे युवक शहर उपाध्यक्ष उपस्थित होते.
–
 चौकट:-
सोलापूर जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागात विविध योजनेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार झालेला आहे जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून आर्थिक घोटाळ्याबाबत चौकशी सुरू असल्याचे समजते.सोलापूर येथील  सामाजिक वनीकरण विभागासमोर हलगीनाद, केश मुंडन, अर्ध नग्न असे विविध आंदोलने २४ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर दरम्यान संघटनेकडून करणार आहोत. न्याय न मिळाल्यास लवकरच विभागीय कार्यालय पुणे येथे तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येइल.
(वसंत देडे, लहुजी शक्ती सेना, सोलापूर जिल्हा अध्यक्ष)

Previous Post

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात पारंपारिक  लढतीचीच शक्यता !

Next Post

आकोट येथे धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण न देणेबाबत अखिल भारतीय आदीवासी विकास परिषद निवेदन

Admin

Admin

Next Post
आकोट येथे धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण न देणेबाबत अखिल भारतीय आदीवासी विकास परिषद निवेदन

आकोट येथे धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण न देणेबाबत अखिल भारतीय आदीवासी विकास परिषद निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697