Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट तालुक्यात ४९ गावात एक गाव एक गणपती उपक्रम

Admin by Admin
September 10, 2024
in सामाजिक
0
अक्कलकोट तालुक्यात ४९ गावात एक गाव एक गणपती उपक्रम

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  ३०३ सार्वजनिक गणेश मंडळाने केली श्री ची प्रतिष्ठापना
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट शहर व तालुक्यात भक्तिमय वातावरणात श्री गणेश उत्सवास प्रारंभ झाला असून  ३०३ सार्वजनिक गणेश मंडळाने श्री ची मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. अक्कलकोट दक्षिण आणि उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४९ गावात एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात आला आहे.दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मैदर्गी, दुधनी यासह इतर गावात १४८ सार्वजनिक गणेश मंडळ आहेत.सदर हद्दीत ७६ गावे असून ३२ ठिकाणी एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात आली आहे.उत्तर पोलीस ठाण्याच्या अक्कलकोट, शहरासह ५६ गावे असून १५५ ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळाने श्रीची मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. सदर हद्दीत १७ गावात एक गाव, एक गणपती उपक्रम राबविण्यात आला आहे. अक्कलकोट शहर व तालुक्यात अत्यंत उत्साहात श्री गणेशाचे स्वागत करण्यात आले आहे. श्री गणेश विसर्जना पर्यंत अनेक सार्वजनिक गणेश मंडळानी विविध सामाजिक ‘ शैक्षणिक कार्यक्रमाचें आयोजन केले आहे.
 पोलीस प्रशासनाकडून अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस विभागाने कडक बंदोबस्तासाठी अधिकारी, कर्मचारी असे मिळून २९० जणांचे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे..  उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली पो नी महेश स्वामी, पीएसआय सिद्राम धायगोडे, सपोनि कांबळे, यांच्यासह ३ अधिकारी, ६८ पोलीस कर्मचारी, ५५ होमगार्ड कडक बंदोबस्तासाठी कार्यरत आहेत.उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंदोबस्तासाठी ७ अधिकारी, ६५ पोलिस कर्मचारी, ६५ होमगार्ड, एक एसआरपी प्लाटून असे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, सपोनि निलेश बागाव, पोलीस उपनिरीक्षक सुशीलकुमार पाखरे, पीएसआय पवार, पंडित चव्हाण, सिद्राम चव्हाण, रामचंद्र राठोड यांच्यासह मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

Previous Post

महाराष्ट्रात विधानसभेसाठी तिसरी आघाडी 

Next Post

गौरी सजावटीचे साहित्याचे दर दहा टक्के वाढले, स्वतः च्या कलात्मक सजावटीकडे नागरिकाचा कल वाढला

Admin

Admin

Next Post
गौरी सजावटीचे साहित्याचे दर दहा टक्के वाढले, स्वतः च्या कलात्मक सजावटीकडे नागरिकाचा कल वाढला

गौरी सजावटीचे साहित्याचे दर दहा टक्के वाढले, स्वतः च्या कलात्मक सजावटीकडे नागरिकाचा कल वाढला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697