लालबाग राजाला पहिल्याच दिवशी काेट्यावधीच दान

मुंबई : मुंबईसह राज्यात गणेशोत्सव थाटामाटात साजरा केला जात असून सर्वत्र चैत्यन्याचे वातावरण आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणेशाच्या दर्शनासाठी गर्दी उसळली असून दानपेटीत पहिल्याच दिवशी कोट्यवधी रुपयांचे दान भाविकांनी अर्पण केले आहे.
तसेच अंबानी कुटुंबाकडून साधारण २० किलोचा, १५ कोटी रुपये किंमतीचा मुकुट गणेशाला अर्पण करण्यात आला आहे.लालबागच्या दानपेटीत पहिल्या दिवशी गोळा झालेल्या दानाची मोजदाद सुरू आहे. सुरुवातीला पेटीतील रोख, त्यानंतर भक्तांनी अर्पण केलेले सोने आणि चांदीच्या दागिन्यांची मोजदाद केली जाणार आहे.
यंदाही पहिल्याच दिवशी लालबाग मंडळाच्या दानपेटीत गणेशभक्तांनी कोट्यवधी रुपयांचे दान दिले आहे.
त्यात रोख रुपये, सोन्या – चांदीचे दागिने नाण्यांचाही समावेश आहे. सोन्याच्या मूर्ती, चांदीचे हार, नोटांचे हार अर्पण केले आहेत.
दानपेटीत दोन बॅटही आहेत.
रोख रक्कमेत परकीय चलनातील काही नोटांचाही समावेश आहे.