Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

माता रमाई स्मारकाबाबत पंधरा दिवसात निर्णय घेऊ – आयुक्त

Admin by Admin
September 9, 2024
in सामाजिक
0
माता रमाई स्मारकाबाबत पंधरा दिवसात निर्णय घेऊ – आयुक्त
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पिंपरी चिंचवड ( अशोक शिवशरण )- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या पाठीमागील मोकळ्या जागेवर माता रमाई आंबेडकर यांचे स्मारक व्हावे या मागणीसाठी आंबेडकर चौक पिंपरी येथे माता रमाई स्मारक समिती गेल्या आठ दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन करत आहे.
सदरचे आंदोलन धुराजी शिंदे व माता रमाई स्मारक समितीचे सर्व सदस्य यांच्यावतीने सुरू आहे.
या बेमुदत धरणे आंदोलनास संभाजी ब्रिगेड तसेच भीमशक्ती या सामाजिक संघटनेने सुद्धा पाठिंबा दिला आहे.
आज या आंदोलनाची दखल घेत पिंपरी चिंचवडचे माननीय आयुक्त शेखर सिंह यांनी आंदोलन स्थळावरुन आंदोलकांना आपली मागणी घेऊन शिष्टमंडळ भेटीस बोलावुन घेतले.
यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी शिष्टमंडळास येत्या पंधरा दिवसात शंभर टक्के निर्णय घेऊ व माता रमाई यांच्या स्मारकाचे काम मार्गी लावू असे आश्वासन दिले.
आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात माता रमाई स्मारक समितीचे धुराजी शिंदे, अरुण मैराळे, दीपक वारभुवन, प्राध्यापक बीबी शिंदे, विकास चव्हाण.शिवाजी झोडगे ,सुरज गायकवाड तसेच वैभव जाधव व राजन नायर इतर सर्व रमाई समिती सदस्य उपस्थित होते.
तसेच यावेळी आंबेडकर चौक पिंपरी येथे सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाची दखल घेऊन माता रमाई स्मारकाच्या कामाचा ठामपणे निर्णय जोपर्यंत घेतला जात नाही तोपर्यंत सदरील आंदोलन सुरूच राहील असे माता रमाई स्मारक समितीच्या कार्यकर्त्यांकडून कळविण्यात आले.

Previous Post

लालबाग राजाला पहिल्याच दिवशी काेट्यावधीच दान

Next Post

विमुक्त जातीतील बोगस राजपूत भामटा यांची घुसखोरी थांबवा,अन्यथा तुमचा सुपडासाफ करु- गोर सेना तालुका अध्यक्ष जिवन राठोड

Admin

Admin

Next Post
विमुक्त जातीतील बोगस राजपूत भामटा यांची घुसखोरी थांबवा,अन्यथा तुमचा सुपडासाफ करु- गोर सेना तालुका अध्यक्ष जिवन राठोड

विमुक्त जातीतील बोगस राजपूत भामटा यांची घुसखोरी थांबवा,अन्यथा तुमचा सुपडासाफ करु- गोर सेना तालुका अध्यक्ष जिवन राठोड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157102
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697