अक्कलकोट ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांचे मंत्रालयाचे सचिव संदेश मेळेकर हे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता आले असता शैक्षणिक क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय भरीव कामगिरी करत असणाऱ्या शिक्षिका श्रीमती रिंकू जाधवर धस जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा उमरगे तालुका अक्कलकोट यांची सहपरिवारासह घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली. .याप्रसंगी मेळेकर यांनी जाधवर (धस ) यांच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. त्यांच्या कार्याचे कौतुक करत असे सामाजिक शैक्षणिक कार्यात समाजासाठी वंचित घटकांसाठी मुलींसाठी पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपणाचा उपक्रम असेल अशा विविध उपक्रमांसाठी व शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाची माहिती मिळाल्यामुळे अक्कलकोटला आले असता त्यांनी जाधवर धस कुटुंबीयांना स्वतः फोन करून त्यांच्याशी बोलून घरी जावून जाधवर मॅडम यांचा सत्कार केला .त्यांच्या सर्व उपक्रमांचे व शैक्षणिक सामाजिक कार्याचे कौतुक करून खरोखरच समाजाबद्दल अशा तळमळीने काम करणाऱ्या शिक्षकांची आज गरज आहे हे कार्य आपण असेच चालू ठेवावे असे बोलून त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या .याप्रसंगी नवनाथ धस सामाजिक कार्यकर्ते तसेच सचिव मेळेकर यांचे संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते .Oplus_131072