सामाजिक

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचे जन्मेजयराजे भोसले यांनी केले अभिनंदन !

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
नुकताच राज्य सरकारच्या वतीने सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सन  २०२४ च्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर गौरव पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाल्याबद्दल श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी भ्रमण ध्वनीवरून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
भारतरत्न स्व.लतादीदी मंगेशकर कुटुंबीय आणि ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचे जन्मेजयराजे भोसले यांचे अतिशय सलोख्याचे संबंध राहिले आहेत. भोसले महाराजांनी वेळोवेळी दीदींच्या प्रती आपला आदर व्यक्त करतात. भोसले आणि मंगेशकर कुटुंबियांचे पूर्वीपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत, हे ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना अवगत आहेच, या पूर्वी ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी मंडळाचा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त होणाऱ्या धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमात आपली सेवा रुजू केली आहे.  
ह्या पार्श्वभूमीवर जन्मेजयराजे भोसले यांनी राज्य सरकारच्या वतीने सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सन  २०२४ च्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर होताच भ्रमण ध्वनीवरून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात येण्याचे निमंत्रण देखील भोसले यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button