Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

मयतास तहसीलमध्ये नेऊन ठेवल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली

Admin by Admin
August 2, 2024
in टॉप न्यूज
0
मयतास तहसीलमध्ये नेऊन ठेवल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

स्मशानभूमीस जागा द्या नाहीतर प्रेताचीअंत्यविधी तुम्हीच करा
अनेक दिवसांपासून टाकळी येथील स्मशानभुमीचा प्रश्न तहसीलदार यांच्या मध्यस्थीने मिटला
नायगाव ( :- सय्यद अजिम नरसीकर )टाकळी ब स्मशानभूमीस जागा द्या नाहीतर प्रेताचीअंत्यविधी तुम्हीच करा म्हणत टाकळी बु. तालुका नायगाव येथील मयतास नायगाव तहसील मध्ये नेऊन ठेवल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर नायगावच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी मयताच्या नातेवाईकांना मी तुमच्या सोबत येऊन स्मशानभूमी साठी जागा उपलब्ध करून देते असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी प्रेत गावाकडे घेऊन आले.तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी सार्वजनिक स्मशानभूमी साठी जागा उपलब्ध करून दिल्त्यानंतर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आला.टाकळी बु तालुका नायगाव येथे गावकऱ्यांना अंत्यविधीसाठी सार्वजनिक स्मशानभूमीच नसल्याने अंत्यविधी करायचा कोठे हा मोठा प्रश्न ग्रामस्थांना उपस्थित होत होता स्मशानभूमी साठी जागा उपलब्ध नसल्याने अनेक वेळा मयत झालेल्या नागरिकांना रस्त्याच्या कडेला अंत्यसंस्कार करावे लागत असे. स्मशानभूमी साठी जागा उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी गावकऱ्यांच्या वतीने तहसील प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देण्यात आले होते.परंतु प्रशासनाने अद्याप कुठल्याही प्रकारची दखल घेऊन जागा उपलब्ध करून दिली नव्हती . दिनांक 2 ऑगस्ट रोजी संतप्त नागरिकांनी सकाळी आठ वाजताच्या सुमारास टाकळी बु येथील लक्ष्मण माणिक रेड्डी वय ७० वर्षं यांचे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाले. त्यानंतर मयत रेड्डी यांचा अंत्यविधी करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने मयताच्या नातेवाईकांनी मृतदेह गावाकडे न नेता थेट नायगाव तहसील कार्यालयात नेऊन ठेवला होता. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती. जवळपास दोन तास नातेवाईकांनी स्मशानभूमीस जागा द्या नाहीतर प्रेताची अंत्यविधी तुम्हीच करा असा एकच हट्ट धरला असता स्वता तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी मयताच्या नातेवाईकांना भेटुन स्मशानभूमी साठी मी जागा उपलब्ध करून देते असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह गावाकडे आणला.त्यानंतर तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी पोलिस कर्मचारी, अभिलेख कर्मचारी, ग्रामसेवक,महसूल कर्मचाऱ्यांची टिम घेऊन तात्काळ टाकळी बु येथे हजर होऊन सार्वजनिक जागेची पाहणी करून सार्वजनिक स्मशानभूमी साठी जागा उपलब्ध करून देण्यात आले. त्यानंतर मयत रेड्डी यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड,सपोनि श्रीधर जगताप, मंडळ अधिकारी अरविंद कावळे, तलाठी ज्योती करवंदे, भुमि लेख विभागांचे कर्मचारी, ग्रामसेवक बोधले सह आदीं उपस्थित होते.

Previous Post

अक्कलकोट तालुक्यात पिके बहरली,  अवघी सृष्टी झाली हिरवीगार !

Next Post

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व साहित्यरत्न लोक शाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त राजाई इंग्लिश मीडियम स्कूल नरसी येथे मोठ्या उत्साहात संपन्न

Admin

Admin

Next Post
लोकमान्य टिळक पुण्यतिथी व साहित्यरत्न लोक शाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त राजाई इंग्लिश मीडियम स्कूल नरसी येथे मोठ्या उत्साहात संपन्न

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व साहित्यरत्न लोक शाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त राजाई इंग्लिश मीडियम स्कूल नरसी येथे मोठ्या उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697