Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

साईचरणी गुरूपौर्णिमा उत्सवात कोट्यवधींची गुरूदक्षिणा

Admin by Admin
July 24, 2024
in महाराष्ट्र
0
साईचरणी गुरूपौर्णिमा उत्सवात कोट्यवधींची गुरूदक्षिणा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

शिर्डी -गुरुपौर्णिमेच्या उत्सवादरम्यान भक्तांनी साईंच्या चरणी सहा कोटी २६ लाखांचं दान केलंय.तीन दिवसाच्या उत्सवात भाविकांनी कोट्यवधींचं दान केलंय.हुंडीमध्ये २ कोटी ५३ लाख,
देणगी काऊंटरला १ कोटी १९ लाख असे ६ कोटी २५ लाखांची रक्कम दान करण्यात आलीये.तर ८ लाख रुपयांचं सोनं आणि २ लाख ७ हजारांची चांदी दान कऱण्यात आलीये.तर गुरुपौर्णिमेच्या उत्सवादरम्यान दोन लाख भाविकांनी दर्शन घेतलंय.तर २०५ भाविकांनी रक्तदान केलंय.शिर्डीच्या साईबाबा मंदिरात गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी झाली असून लाखो भाविकांनी दर्शन घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.साईबाबांच्या तीनदिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवासाठी देश-विदेशातून सुमारे दोन लाख भाविकांनी दर्शन घेतले.त्याचबरोबर लाखो भाविकांनी दर्शनासह साईबाबांच्या चरणी दान केले आहे.गुरूपौर्णिमा उत्सवात साईचरणी कोट्यवधींची गुरूदक्षिणा भाविकांकडून दान करण्यात येत आहे.उत्सवाच्या तीन दिवसांत सहा कोटी २५ लाख ९८ हजार ३४४ इतकी दान जमा झाले आहे.यामध्ये रोख स्‍वरुपात २ कोटी ५३ लाख २९ हजार ५७५ दक्षिणा पेटीत प्राप्‍त झाली.तर देणगी काऊंटर १ कोटी १९ लाख ७९ हजार १९० रुपये, सशुल्‍क पास ४६ लाख ७३ हजार ४००,डेबीट क्रेडीट कार्ड,ऑनलाईन देणगी,चेक डी.डी.देणगी, मनी ऑर्डर असे एकूण १ कोटी ९५ लाख १३ हजार ८८४ रुपये,सोने ८ लाख ३१ हजार ३८८ आणि चांदी २ लाख, ७० हजार ९०७ यांचा समावेश आहे.गुरूपौर्णिमा उत्‍सव कालावधीत साधारणतः दोन लाखहून अधिक साईभक्‍तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला.उत्‍सव कालावधीमध्‍ये साईप्रसादालयाद्वारे सुमारे १ लाख ९१ हजार ३४९ साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला.तर दर्शन रांगेत १ लाख ९६ हजार २०० साईभक्‍तांना मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे वाटप करण्‍यात आले.या कालावधीत ६२ लाख ३१ हजार १२५ रूपये सशुल्‍क प्रसादरुपी लाडू पाकीटांच्‍या माध्‍यमातून प्राप्‍त झाले.उत्‍सवा दरम्‍यान संस्‍थान परिसरात उभारण्‍यात आलेल्‍या प्रथमोपचार केंद्रात साधारण ५८१० साईभक्‍तांनी उपचार घेतले तसेच २०५ साईभक्‍तांनी रक्‍तदान केले असे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितलेसमाजोपयोगी कामासाठी दानाचा उपयोग -दरम्यान भाविकांकडून मिळालेल्या देणगीतून संस्थान विविध भक्तोपयोगी आणि समाजोपयोगी कामे करते.साईसंस्थानचे साईनाथ रूग्णालयात नि:शुल्क तर साईबाबा रूग्णालयात माफक दरात वैद्यकीय उपचार करण्यात येतात.मोठ्या आजारांसाठी गोरगरीब रूग्णांना वैद्यकीय अनुदान देण्यात येते.प्रसादालयात मोफत अन्नदान करण्यात येते.वर्षाकाठी जवळपास दीड कोटी भाविक याचा लाभ घेतात.संस्थानच्या शैक्षणिक संकुलात सहा हजार विद्यार्थी नाममात्र दरात ज्ञानार्जन करत आहेत.भाविकांना माफक दरात निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.राष्ट्रीय व नैसर्गिक आपत्तीतही संस्थान मदत करते.

Previous Post

म्हैसा रोड वरील अपघातात चार ठार

Next Post

खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत अर्थसंकल्पावर बोलताना सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी केल्या अनेक मागण्या 

Admin

Admin

Next Post
खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत अर्थसंकल्पावर बोलताना सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी केल्या अनेक मागण्या 

खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत अर्थसंकल्पावर बोलताना सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी केल्या अनेक मागण्या 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157096
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697