Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट शहरात पोलिसांच्या बंदोबस्तामुळे श्री गुरुपौर्णिमा उत्सव निमित्त दर्शनासाठी आलेल्या  भाविकांचीं झाली  सोय

Admin by Admin
July 22, 2024
in टॉप न्यूज
0
अक्कलकोट शहरात पोलिसांच्या बंदोबस्तामुळे श्री गुरुपौर्णिमा उत्सव निमित्त दर्शनासाठी आलेल्या  भाविकांचीं झाली  सोय
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट (प्रतिनिधी )श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त अक्कलकोट नगरीत श्री स्वामी समर्थाच्यां दर्शनासाठी आलेल्या लाखो स्वामी भक्ताची पोलीस प्रशासनाच्या तगड्या बंदोबस्तामुळे चांगली सोय झाली.उत्तर पोलीस ठाणे दक्षिण पोलीस ठाणे , होमगार्ड जवान यांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.अक्कलकोट तीर्थक्षेत्र नगरीत विविध ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्वत्र  बंदोबस्त ठेवल्यामुळे परगावच्या भाविक भक्तांना कोणताही त्रास झाला नाही. पोलिसांच्या चोख पोलीस बंदोबस्तामुळे भाविकातून समाधान व्यक्त केले जात आहे .

तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत रविवार दिनांक 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यातून लाखो भाविक भक्त हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. हजारो भाविक भक्त हे आपल्या खाजगी वाहनातून अक्कलकोट नगरीत आले होते. भाविक भक्तांची वाढती संख्या लक्षात घेता उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे तसेच दक्षिण पोलीस ठाण्याच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर श्री स्वामी समर्थ समाधी मठ तसेच शहरातील विविध चौकांमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. यामध्ये १४५ पोलीस अधिकारी व कर्मचारी १०० होमगार्ड जवान यांचा समावेश होता.अक्कलकोट शहरातील राजे फत्तेसिंह चौक कमला राजे चौक बायपास चौक स्वामी समर्थ समाधी मठ परिसर तसेच अन्नछत्र मंडळासमोरील परिसरामध्ये पोलिसांनी  चोख बंदोबस्त ठेवला होता या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ परिसरातील ठिकाणी पोलिसांनी टॉवर  कक्ष उभे करून  भाविक भक्तांना मार्गदर्शन केले. पोलीस प्रशासन व होमगार्ड यांच्याकडून भाविकांना त्यांच्या गाड्या पार्किंगसाठी मार्गदर्शन करण्यात आले. अक्कलकोट शहरातील विविध ठिकाणी चौकाचौकांमध्ये बॅरिगेट्स मारून त्या ठिकाणी पोलिसांना उभे करण्यात आले होते . 
यामुळे भाविकांना होणारा त्रास हा कमी प्रमाणात  होण्यास मदत झाली आहे. पोलीस कर्मचारी हे गुरु पौर्णिमे दिवशी पहाटे पासूनच शहरातील विविध भागात बंदोबस्तासाठी उभे होते. रात्री ११ वाजेपर्यंत पोलीसांनी बंदोबस्त करत असल्याचे दिसत होते.
श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात  स्वामी भक्तांना दर्शन सुलभतेने होण्यासाठी सर्वत्र पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता..या ठिकाणी पोलिसांनी स्वामीभक्तांना व्यवस्थित रांगेमध्ये दर्शन घेण्यासाठी मदत केली. पोलिसांच्या या तगडा बंदोबस्तामुळे परगावच्या भाविक भक्तांना होणारा त्रास हा कमी  झाला. पोलीस प्रशासनाच्या या कामाचे परगावच्या भाविकातून तसेच अक्कलकोटकरांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी यामावार अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे दक्षिण पोलीस ठाण्याचे एपीआय कांबळे तसेच त्यांचे सहकारी सर्व पोलीस कर्मचारी होमगार्ड जवान यांनी परिश्रम घेतले.
Previous Post

अन्नछत्र मंडळाच्या महाप्रसादगृह इमारतीचा भूमिपूजन सोहळा रविवारी मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न

Next Post

विशालगड “गाजापुर” येथील हिंसक घटनेच्या विरोधात अक्कलकोट मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदार विनायक मगर यांना निवेदन 

Admin

Admin

Next Post
विशालगड “गाजापुर” येथील हिंसक घटनेच्या विरोधात अक्कलकोट मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदार विनायक मगर यांना निवेदन 

विशालगड "गाजापुर" येथील हिंसक घटनेच्या विरोधात अक्कलकोट मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदार विनायक मगर यांना निवेदन 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157098
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697