Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट , दुधनी आणि मैंदर्गी नगर परिषदेचे कारभारी आज ठरणार ! 

Admin by Admin
December 21, 2025
in राजकीय
0
अक्कलकोट , दुधनी आणि मैंदर्गी नगर परिषदेचे कारभारी आज ठरणार ! 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मतमोजणीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज 
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट मैंदर्गी आणि दुधनी नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आज दिनांक २१ डिसेंबर रोजी लागणार असून या नगरपरिषदेचे कारभारी आज मतमोजणीनंतर ठरणार आहेत. या मतमोजणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
 अक्कलकोट नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार हे निवडणुकीच्या मैदानात होते. तर सदस्य पदाच्या २५ जागांसाठी ७६ उमेदवार उभे होते. थेट नगराध्यक्ष पदासाठी भाजपाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी , काँग्रेस पक्षाचे उमेदवार अशपाक बळोर्गी ,शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रईस टिनवाला यांच्यात लढत होत असून अक्कलकोट नगरीचा नगराध्यक्ष कोण हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे .अक्कलकोट नगर परिषदेच्या २५ नगरसेवक पदांसाठी ७६ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. मतमोजणी नंतर २५ नगरसेवक कोण याचा फैसला होणार आहे. मैंदर्गी नगर परिषदेच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि स्थानिक  गटातील उमेदवारांमध्ये लढत होत आहे. तसेच नगरसेवक पदाच्या वीस जागांसाठी ४६ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. थेट नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या उमेदवार अंजली बाजारमठ यांच्या विरोधात स्थानिक आघाडीच्या उमेदवार शिवम्मा पोतेनवरू यांच्यात दुरंगी लढत झाली असून मैंदर्गीचा नगराध्यक्ष कोण हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. तसेच २० नगरसेवक कोण असणार याचाही निकाल आज लागणार आहे. दुधनी नगरपरिषद निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार उभे होते. दुधनीचा नगराध्यक्ष कोण असणार याचा फैसला आज मतमोजणी नंतर होणार आहे. तसेच दुधनीतील २० नगरसेवक पदाच्या जागासाठी ५३ उमेदवार उभे होते. यातील २० नगरसेवक यांचा निकाल आज लागणार आहे. दुधनी नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी भाजपाचे उमेदवार अतुल मेळकुंदे , शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रथमेश म्हेत्रे , काँग्रेस पक्षाचे उमेदवार महेश स्वामी बाहेरमठ यांच्यात टक्कर होत आहे. दुधनीच्या नगराध्यक्ष कोण त्याचा फैसला आज मतमोजणीनंतर होणार आहे. सर्वच पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना या मतमोजणीची उत्सुकता लागली आहे. विजयी गुलाल कोणाचा उधळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा काम करत असून अक्कलकोट , मैंदर्गी, दुधनीत  मतमोजणीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. अक्कलकोट ,मैंदर्गी आणि दुधनी नगरपरिषद निवडणुकीचे निर्णय अधिकारी हे परिश्रम घेत आहेत. अक्कलकोट , मैंदर्गी आणि दुधनीत राजकीय सत्ता कोणाची असणार याचा फैसाला आज होणार आहे.अक्कलकोट नगरपरिषद निवडणूक मतमोजणी प्रियदर्शनी मंगल कार्यालय येथे दिनांक २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरु होणार आहे, मतमोजणी साठी १२ टेबल तयार करण्यात आले असून प्रत्येक टेबलवर एका प्रभागाची मतमोजणी होणार आहे, साधारण पणे काही प्रभागाच्या ३ ते ६ फेऱ्या होणार आहेत, मतमोजणी साठी १२ पथके नियुक्त करण्यात आली आहेत,मतमोजणी साठी पत्रकारांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे, १२५ पोलीस स्टाफ नियुक्त असून, मतमोजणी साठी फक्त उमेदवाराद्वारे नियुक्त मतमोजणी प्रतिनिधीनाच प्रवेश देण्यात येणार आहे, सर्व निकाल स्पीकर द्वारे बाहेर ऐकायला येतील अशी व्यवस्था केलेली आहे.
Previous Post

संतश्रेष्ठ गाडगे महाराज

Next Post

साहित्यिक दगडू मारुती पवार उर्फ दया पवार

Admin

Admin

Next Post
साहित्यिक दगडू मारुती पवार उर्फ दया पवार

साहित्यिक दगडू मारुती पवार उर्फ दया पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157262
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697