अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करण्यात यावी

पद्मशाली समाजाच्या शिष्टमंडळाचे तहसीलदारांना निवेदन
नायगाव / नांदेड (:- सय्यद अजीम नरसीकर )ढाणकी ता. उमरखेड जि. यवतमाळ येथील पद्यशाली समाजातील अल्पवयीन विद्यार्थीनीवर लैगिंक अत्याचार व त्यामध्ये तिचा मृत्यु या दुर्देवी घटनेस जबाबदार असलेल्या नराधमास तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी व या कृत्यामध्ये सहभागी असलेल्यांना सहआरोपी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पद्मशाली समाजाच्या वतीने तहसीलदाराकडे करण्यात आली.
कोचिंग क्लासेस चालवणारा शिक्षक संदेश गुंडेकर रा. सरसम (बु) ता. हिमायतनगर ह.मु. ढाणकी ता.उमरखेड याने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार केले. सदरील अल्पवयीन मुलीचा (ता.२२)सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या नराधमाने व त्याच्या भावांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. पिडीत युवतीच्या कुटुंबावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी ढाणकी येथील पद्मशाली समाजाच्या शिष्ठमंडळाने पोलीस स्टेशन बिटरगाव ता.उमरखेड येथे निवेदन दिल्यानंतर संबंधीत आरोपीस अटक करण्यात आली आहे. या घटनेने संपुर्ण महाराष्ट्रातील पदाशाली समाजामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून, या गंभिर गुन्ह्यामधील आरोजी संदेश गंडेकर याला साथ देणारे त्याचे भाऊ साईर्शज गुंडेकर, आशिष गुंडेकर व या कृत्यात सहभागी सर्व आरोपींना सहआरोपी करण्यात यावी तसेच दुसऱ्या आरोपींनाही तात्काळ अटक करण्यता यावी यासाठी पद्मशाली समाजाच्या शिष्टमंडळाने सोमवारी तहसीलदारांची भेट घेवून निवेदन दिले.
यावेळी जेष्ठ पत्रकार प्रभाकर लखपत्रेवार, पद्मशाली समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण चन्नावार, रानसुगावचे सरपंच गोविंद संग्रपवार, युवक पद्मशाली संघटनेचे कैलास रामदिनवार, बालाजी वंगावार, साईनाथ चन्नावार, निलेश बिरेवार, लक्ष्मण बुध्दलवाड, शंकर तालकोकूलवार, हनमंत चिलकेवार, गंगाराम गोनेवार, यादव कोकूलवार, मारोती आलगटलेवार, बालाजी चलमेवार, माधव जलदेवार, पंढरीनाथ संदपनवार, गजानन गुरुपवार, गोविंद तालकोकूलवार, गजानन अडबलवार, साईनाथ आलेवार, राजेंद्र कांबळे, गोपीनाथ आंबटवार, पांडुरंग मंगलपवार, साईनाथ बोईनवाड, शिवाजी मोरेवार, राजेश बेळगे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.



