Thursday, September 3, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

पुण्यात कचरावेचक अंजू माने यांचा प्रामाणिकपणा

Admin by Admin
November 22, 2025
in महाराष्ट्र
0
पुण्यात कचरावेचक अंजू माने यांचा प्रामाणिकपणा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पुणे: स्वच्छ संस्थेच्या कचरावेचक अंजू माने नेहमीप्रमाणे सदाशिव पेठ भागात २० नोव्हेंबर रोजी देखील सकाळी ७ वाजल्यापासून दारोदार जाऊन कचरा गोळा करण्याचे काम करत होत्या. गोळा केलेला कचरा फिडर पॉईंटला आणताना अंदाजे ८ ते ९ च्या दरम्यान त्यांना रस्त्याच्या कडेला एक बॅग पडलेली दिसली. यापूर्वीही अशाच औषधाच्या बॅग मिळाल्याचा अनुभव अंजू यांना होता म्हणून तशीच कोणाची बॅग असेल असा विचार करून त्यांनी ती बॅग फीडर पॉइंट ला सुरक्षित ठेवली. पण बॅग उघडून पाहिल्यानंतर औषधांसोबत त्यात  रोख रक्कम असल्याचे त्यांच्या लक्षात आले. गेली जवळपास २० वर्षे या भागात काम करत असल्यामुळे अंजू परिसरातील सर्व नागरिकांना ओळखतात. त्यांनी ओळखीतील नागरिकांच्या मदतीने परिसरातील सर्वांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान एक नागरिक (त्यांनी केलेल्या विनंतीनुसार त्यांचे नाव व ओळख उघड करू शकत नाही) अतिशय अस्वस्थपणे काहीतरी शोधत असल्याचे अंजू ताईंनी पाहिले. त्यांनी त्या नागरिकाला बोलवून, आधी पाणी देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला आणि सापडलेली बॅग त्यांचीच असल्याचे निश्चित करून दहा लाख रक्कम जशीच्या तशी असलेली बॅग परत केली.  नागरिकानी देखील अंजू ताईंच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करण्यासाठी त्यांना साडी व काही रोख रक्कम देऊन त्यांचा परिसरातील सर्व नागरिकांच्या साथीने सत्कार केला. अंजू माने यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की स्वच्छ मॉडल मुळे कचरा वेचक आणि नागरिक यांच्यातील नात्याची विश्वासाची वीण मागील २० वर्षात अधिक घट्ट झाली आहे. २० वर्ष दररोज दारोदार कचरा संकलन सेवा पुरवताना या प्रामाणिकपणामुळेच कचरावेचकांनी नागरिकांच्या मनात घर केलं आहे. ४० लाख पुणेकरांना ४००० ‘स्वच्छ’चे कचरावेचक पुरवत असलेल्या दैनंदिन दारोदार कचरा संकलनाच्या सेवेतही हा प्रामाणिकपणा सातत्याने दिसून येतो.
Previous Post

महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले……? 

Next Post

सीजेआय गवईंच्या सहा महिन्यांच्या कार्यकाळात एससीच्या 10 आणि ओबीसींच्या 11 न्यायाधीशांची हायकोर्टात नियुक्ती

Admin

Admin

Next Post
सीजेआय गवईंच्या सहा महिन्यांच्या कार्यकाळात एससीच्या 10 आणि ओबीसींच्या 11 न्यायाधीशांची हायकोर्टात नियुक्ती

सीजेआय गवईंच्या सहा महिन्यांच्या कार्यकाळात एससीच्या 10 आणि ओबीसींच्या 11 न्यायाधीशांची हायकोर्टात नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157522
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697