Thursday, September 3, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट शहर – तालुक्यात बोगस जातीच्या दाखल्यांचा सुळसुळाट !

Admin by Admin
November 1, 2025
in सामाजिक
0
अक्कलकोट शहर – तालुक्यात बोगस जातीच्या दाखल्यांचा सुळसुळाट !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट शहर व तालुक्यातील राजकीय नेत्यांकडे बनावट ,बोगस जातींचे दाखले मोठ्या प्रमाणात असून मूळ लाभार्थी जातींच्या राजकीय हक्कावर अन्याय होत आहे. राजकीय नेत्यांच्या जातींच्या दाखल्यांची जात पडताळणी होणे गरजेचे असून जात चोर राजकीय नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे .
सध्या स्थानिक स्वराज्य  संस्थेच्या निवडणुकींचीं धामधूम सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले आहे. ओबीसी , एससी , सर्वसाधारण , एसटी प्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. या आरक्षणावर डोळा ठेवत अनेक राजकीय नेत्यांनी बोगस जातीचे प्रमाणपत्राद्वारे निवडणुकीत उतरण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अक्कलकोट तालुक्यात अनेक राजकीय नेत्यांकडे तसेच प्रतिष्ठीत लोकांकडे बोगस जातींचे प्रमाणपत्र आढळले आहे. बोगस जातीचे प्रमाणपत्र देणारी सोनेरी टोळी अक्कलकोट तालुक्यात कार्यरत आहे. बोगस जातीच्या दाखल्याप्रकरणी अनेक नेत्यांचीं चौकशी झाली आहे .अक्कलकोट तालुक्यात एससी , ओबीसी समाजाचे जातीचे दाखले हे सर्वसाधारण गटातील राजकीय नेत्यांकडे आहेत. बोगस जातीचे दाखले काढून मूळ लाभार्थी जातींवर अन्याय करण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांकडून करण्यात येत आहे. ग्रामपंचायत पासून ते पंचायत समिती , जिल्हा परिषद , नगरसेवक पदासाठी इच्छुक असणाऱ्या राजकीय नेत्यांकडे बोगस जातीचे दाखले असल्याची चर्चा रंगत आहे. काही राजकीय नेत्यांनी कर्नाटकातील राजकीय आरक्षणाचा संदर्भ देत बोगस जातींचे दाखले काढले आहेत. अक्कलकोट शहर तालुक्यातील बोगस जातीच्या दाखल्यामुळे मूळ लाभार्थी जातींवर अन्याय होत असून राजकीय नेत्यांच्या जातीच्या दाखल्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या सर्वच उमेदवारांच्या जातीच्या दाखल्यांची , जात प्रमाणपत्रांची पडताळणी होणे आवश्यक आहे अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. बोगस जातींचे दाखले असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
Previous Post

गुरववाडीच्या सरपंच लक्ष्मी पुजारी “आदर्श सरपंच” पुरस्काराने सन्मानित

Next Post

अभिनेता, खलनायक गणेशकुमार नरवाडे उर्फ सदाशिव अमरापूरकर यांचा स्मृतिदिवस

Admin

Admin

Next Post
अभिनेता, खलनायक गणेशकुमार नरवाडे उर्फ सदाशिव अमरापूरकर यांचा स्मृतिदिवस

अभिनेता, खलनायक गणेशकुमार नरवाडे उर्फ सदाशिव अमरापूरकर यांचा स्मृतिदिवस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157511
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697