Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

गुरववाडीच्या सरपंच लक्ष्मी पुजारी “आदर्श सरपंच” पुरस्काराने सन्मानित

Admin by Admin
November 1, 2025
in सामाजिक
0
गुरववाडीच्या सरपंच लक्ष्मी पुजारी “आदर्श सरपंच” पुरस्काराने सन्मानित
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 जिल्ह्यातील एकमेव गावाला  मिळाला सन्मान, पुजारी दाम्पत्यांच्या कार्याचा गौरव 
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट तालुक्यातील गुरववाडीच्या कार्यक्षम सरपंच लक्ष्मी माळप्पा पुजारी यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे असा पुरस्कार प्राप्त झालेल्या त्या सोलापूर जिल्ह्यातील एकमेव सरपंच आहेत.
स्वराज्य सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने  आयोजित राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा २०२५ मध्ये त्यांना हा बहुमान देऊन गौरवण्यात आले. अहिल्यानगर येथील माऊली संकुल सभागृहात दि. ३० ऑक्टोबर रोजी हा सोहळा पार पडला. सोहळ्यात राज्यातील विविध जिल्हे व तालुक्यांमधील ४५ सरपंचांना गावपातळीवर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गौरविण्यात आले. त्यात गुरववाडीच्या सरपंच लक्ष्मी माळप्पा पुजारी यांना गेल्या पाच वर्षात त्यांनी गावच्या चौफेर विकासासाठी केलेले काम पाहून या बहुमानाने सन्मानित करण्यात आले. लक्ष्मी माळप्पा पुजारी व गावचे विकासरत्न, माजी सरपंच माळप्पा पुजारी या दांपत्याचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
सोहळ्याला स्वराज्य सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष रोहित पवार, सचिव बाबासाहेब पावसे, संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक यादवराव पावशे, जिल्हा संपर्कप्रमुख अमोल शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.सोहळ्याच्या आयोजनासाठी महाराष्ट्र राज्य स्वराज्य सरपंच सेवा संघाचे कार्यकर्ते व स्थानिक पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला राज्यभरातून अनेक नेतेमंडळी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
गुरववाडी गावातून सिद्धाराम पुजारी (गुड्डूद), श्रीमंत सावळी,महानंदा पुजारी व शिलवंती निंबाळ (मैंदर्गी) यांची कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती होती.
Previous Post

वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मोठ्या ताकतीने लढवणार

Next Post

अक्कलकोट शहर – तालुक्यात बोगस जातीच्या दाखल्यांचा सुळसुळाट !

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट शहर – तालुक्यात बोगस जातीच्या दाखल्यांचा सुळसुळाट !

अक्कलकोट शहर - तालुक्यात बोगस जातीच्या दाखल्यांचा सुळसुळाट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157241
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697