Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सिन्नूर ग्रामपंचायतमध्ये सेवेवर नसणाऱ्या ग्रामसेवकाकडून रजिस्टरमध्ये उतारे नोंद, सरपंच श्रीमती कल्पना  सोनकांबळे यांची चौकशीची मागणी

Admin by Admin
August 24, 2025
in सामाजिक
0
सिन्नूर ग्रामपंचायतमध्ये सेवेवर नसणाऱ्या ग्रामसेवकाकडून रजिस्टरमध्ये उतारे नोंद, सरपंच श्रीमती कल्पना  सोनकांबळे यांची चौकशीची मागणी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यातील सिन्नूर  ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक कार्यालयात उपस्थित नसताना मागील ग्रामसेवक व क्लार्क यांनी संगनमताने आठ नंबर रजिस्टर मध्ये उतारे नोंद केले असून याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सिन्नूर गावच्या सरपंच श्रीमती कल्पना सोनकांबळे यांनी अक्कलकोट  पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 या निवेदनात मागील ग्रामसेवक सादिक वळसंगकर व क्लार्क शिवपुत्र जेवरगी यांनी अधिकार नसताना आठ नंबर रजिस्टर मध्ये अनेक जागेच्या नोंदी केल्या आहेत .जागेच्या नोंदी करण्यासाठी ग्रामस्थांकडून पैसे घेण्यात आले. स्वतः सरपंच श्रीमती कल्पना सोनकांबळे या कार्यालयात उपस्थित असताना दिनांक १४ ऑगस्ट रोजी मागील ग्रामसेवक सादिक वळसंगकर यांनी मनमानी करत आठ नंबर रजिस्टर मध्ये नावे नोंद केले असे निवेदन सरपंच श्रीमती कल्पना सोनकांबळे यांनी अक्कलकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शंकर कवितके यांना दिले आहेत. गावातील सेवाकाळ समाप्त झालेले मागील ग्रामसेवक व क्लार्क यांना ग्रामपंचायत मध्ये मनमानी कारभार करण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल सरपंच श्रीमती कल्पना सोनकांबळे यांनी केला आहे. मागासवर्गीय महिला सरपंच असताना कोणताही विचार न करता मागील ग्रामसेवक व क्लार्क यांनी माझ्या उपस्थितीमध्ये रजिस्टर मध्ये नाव नोंदवून माझा अपमान केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून या दोघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सरपंच श्रीमती कल्पना सोनकांबळे यांनी केला आहे. अन्यथा पंचायत समिती अक्कलकोट कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा सरपंच श्रीमती कल्पना सोनकांबळे यांनी दिला आहे.
Previous Post

देव माणुस केंद्रित आहे, माणूस देव केंद्रित नको.

Next Post

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका प्रसंगी स्वतंत्र लढा – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

Admin

Admin

Next Post
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका प्रसंगी स्वतंत्र लढा – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका प्रसंगी स्वतंत्र लढा - केंद्रीय मंत्री रामदास आठवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157267
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697