Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका प्रसंगी स्वतंत्र लढा – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

Admin by Admin
August 24, 2025
in राजकीय
0
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका प्रसंगी स्वतंत्र लढा – केंद्रीय मंत्री रामदास आठवले
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुर्डूवाडी / सोलापूर -राज्यात येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपसमोर युतीचा प्रस्ताव ठेवा, त्यांनी समाधानकारक जागा दिल्या नाही तर इतर पक्षाशी युती करा. मात्र राष्ट्रवादी शरद पवार व ‘उबाठा’ सेनेच्या नादी लागू नका, प्रसंगी स्वतंत्र लढा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले.

ना. आठवले यांच्या अध्यक्षतेखाली तुळजाई लॉन्स कुर्डूवाडी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चा मेळावा झाला. याप्रसंगी ते बोलत होते. ना. आठवले पुढे म्हणाले, मी सुरुवातीच्या काळात गावोगावी फिरून पक्ष मजबूत केला. दलित पँथरच्या शाखा गावोगावी होत्या. त्यांचे बोर्ड जुन्या काळात सर्व ठिकाणी दिसायचे. मात्र आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बोर्ड व शाखा गावात दिसत नाहीत, याची खंत वाटते. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडीसारखा राजकीय पॅटर्न राबवून जि. प.च्या व नगरपालिकेत जास्तीत जास्त सदस्य निवडून आणा. केवळ एका बौद्ध समाजाच्या जातीवर सदस्य निवडून येऊ शकत नाही, यामुळे इतर जातीतील लोकांनाही आपल्या पक्षात घेण्याचे आवाहन ना. आठवले यांनी केले .

रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी आपले सहयोगी पक्ष निवडणुकीत व नंतरही आपल्याला विचारात घेत नाहीत, यामुळे स्थानिक निवडणुकांमध्ये स्वतंत्रपणे लढण्यासाठी निर्णय घ्यायचा आम्हाला अधिकार द्या, अशी विनंती सरवदे यांनी आठवलेंना केली. प्रास्ताविक अमर माने यांनी केले. यावेळी सुनील सर्वगोड, जितेंद्र बनसोडे, बाळासाहेब शेंडगे, दशरथ कसबे, सोमनाथ भोसले, संजय बनसोडे, हनुमंत कसबे, नागनाथ ओहोळ, श्यामसुंदर गायकवाड, मारुती वाघमारे यांनी पक्षवाढी संदर्भात विचार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी सूरज जगताप, आकाश जगताप, बंडू भोसले, समद मुलाणी, सुहास शेंडगे, सौरभ गायकवाड, शाहिद मुलाणी, सिद्धार्थ इंगळे, अण्णा नायडू, कृष्णा अस्वरे, सोमनाथ माने, सिकंदर शेख, विजय देवकते, भैया चांदणे, अनिकेत नवगिरे, रवी एडके, कपिल शिवशरणसह पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

सिन्नूर ग्रामपंचायतमध्ये सेवेवर नसणाऱ्या ग्रामसेवकाकडून रजिस्टरमध्ये उतारे नोंद, सरपंच श्रीमती कल्पना  सोनकांबळे यांची चौकशीची मागणी

Next Post

करमाळ्याच्या सावंत कुटुंबीयांकडून सालाबादप्रमाणे बैलपोळा उत्साहात साजरा…

Admin

Admin

Next Post

करमाळ्याच्या सावंत कुटुंबीयांकडून सालाबादप्रमाणे बैलपोळा उत्साहात साजरा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157266
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697