Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार

Admin by Admin
August 19, 2025
in राजकीय
0
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भर पावसात शेकडो कार्यकर्ते जिल्हा बैठकीसाठी उपस्थित

परंडा / धाराशिव ( फारूक शेख )

वंचित बहुजन आघाडी जिल्हा पक्ष संघटन आढावा बैठक तुळजापूर येथे जिल्हा निरीक्षक अविनाश भोसीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां साठी वंचित बहुजन आघाडी पक्षाची धाराशिव जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी पक्षाची ताकद संपूर्ण आढावा याप्रसंगी घेण्यात आला
शनिवारी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये वंचित बहुजन आघाडीची धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती व संभाव्य नगरपंचायत,नगरपरिषद,पंचायत समिती,जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत व्यापक स्वरूपात बैठक संपन्न झाली या बैठकीसाठी पक्षाचे जिल्हा निरीक्षक अविनाश भोसीकर,जिल्हा प्रभारी ॲड.रमेश गायकवाड,युवक आघाडी जिल्हा निरीक्षक अमोल लांडगे,जिल्हाध्यक्ष ॲड.प्रणित डिकले,जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के उपस्थित होते.
याप्रसंगी धाराशिव जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढण्याचा निर्धार करण्यात आला जिल्ह्यातील वंचित शोषित पीडित समाज घटकांच्या न्याय हक्क अधिकारांसाठी लढणारा वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे. सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी सातत्याने निवेदने आंदोलने पक्षाच्या माध्यमातून करून पक्ष कायम सर्वसामान्यांच्या बाजूने उभा राहतो सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी लढवणार असा निर्धार या बैठकीमध्ये करण्यात आला याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष आर एस गायकवाड,नासिर शेख,रविकिरण बनसोडे,रुस्तमखा पठाण,जिल्हा संघटक विकास बनसोडे,परमेश्वर लोखंडे,प्रवक्ता ॲड. के.टी.गायकवाड,शिवाजी कांबळे,उमेश कांबळे,अमोल शेळके,वंचित बहुजन माथाडी कामगार जनरल युनियन जिल्हाध्यक्ष सुधीर वाघमारे,युवा आघाडीचे गोविंद भंडारे,जीवन कदम,विनायक दुपारगुडे,माजी जिल्हाध्यक्ष बि.डी.शिंदे,मिलिंद रोकडे,रामभाऊ गायकवाड,भारतीय बौद्ध महासभेचे उमाजी गायकवाड,समता सैनिक दला च्या आम्रपाली बसवराज गोतसुर्वे,पंकज सोनकांबळे,नितीन सीतापुरे सहदेव कांबळे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी शनिवारी सातत्याने पाऊस चालू असताना देखील बैठकीसाठी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक धनंजय सोनटक्के यांनी केले सूत्रसंचालन गोविंद भंडारे तर आभार प्रदर्शन जीवन कदम यांनी केले.

Previous Post

जालना जिल्ह्यातील अनंत कुलकर्णी डी .वाय.एस.पी व त्यांच्या साथीदारानां निलंबित करा

Next Post

तालुकास्तरीय कराटे स्पर्धा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात संपन्न

Admin

Admin

Next Post
तालुकास्तरीय कराटे स्पर्धा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात संपन्न

तालुकास्तरीय कराटे स्पर्धा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157266
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697