जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तत्काळ दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ प्रश्न मार्गी लावण्याचा आदेश
सोलापूर (प्रतिनिधी)-सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील गोसावी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य डॉक्टर नितीन ढेपे , जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे ,युवक जिल्हा अध्यक्ष दीपक पराध्ये, शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार , युवक शहराध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रश्नांसाठी निवेदन देण्यात आले.
अक्कलकोट तालुक्यात दोन ठिकाणी गोसावी समाज यांची वस्ती आहे. एक सांगवी दुसरा चिक्केहल्ली या ठिकाणी आहे. गोसावी समाज अत्तर व भंगार वस्तू विकून आपला उदर निर्वाह करीत असतो. वर्षभर सगळीकडे भटकंती करून आपल्या मुलाबाळांचा पोटापाण्याचा प्रश्न सोडवत असतो. शासनाकडून आजपर्यंत अनेक योजना भटक्या समाजासाठी केलेले असून परंतु त्या अद्यापही या समाजापर्यंत पोहोचलेला नाही.
आपला देश स्वातंत्र्य होऊन ७८ वर्ष होऊन गेले तरी या समाजाला अद्यापही जातीचा दाखला आधार कार्ड रेशन कार्ड जन्म दाखला पिण्यासाठी पाणी जाण्या येण्यासाठी रस्ता लाईट गटारी या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मिळालेल्या नाहीत .या मूलभूत अधिकारासाठी प्रशासकीय यंत्रणा विविध कारणे देऊन आढळून करीत असते, यांच्या मुलासाठी भविष्याची कुठलीही सोय शासनाने अद्याप केलेले नाही. घरकुल योजनेसाठी जमीन उपलब्ध नाही. म्हणून हा समाज अजूनही भटकंती करून उपजीविका करीत असतो याच कारणास्तव वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देऊन त्वरित शासनाच्या वतीने शिबिर लावून सर्व भटक्या लोकांना आधार पत्रिका निवडणूक ओळखपत्र जातीचा दाखला व इतर अधिकाऱ्यांच्या गोष्ट बहाल कराव्या ,
गोसावी समाजासाठी घरकुल योजना मार्गे लावावी ,
गोसावी समाजाच्या वस्तीमध्ये रस्ता पाणी शाळा या मूलभूत गरजांची पूर्तता करावी.
आणि या भटक्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाने अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.
या निवेदनाची दखल माननीय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तत्काळ घेऊन संबंधित प्रांत अधिकारी तहसीलदार आणि जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी यांना भ्रमणध्वनी द्वारे आदेश देऊन आठ दिवसाच्या आत मध्ये अहवाल सादर सूचना यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी अक्कलकोट तालुक्यातील गोसावी समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. तसेच वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे , शहर महासचिव विनोद इंगळे , आतिश बनसोडे , विक्रांत गायकवाड , जिल्हा उपाध्यक्ष वैभव भंडारे, युवक जिल्हा सचिव सोमनाथ डावरे , संगेपांक श्रीनिवास, अमर डुरके ,रोहित लालसरे, विजयकांत उघडे, विजय गायकवाड, रवी थोरात, शंकर शिंदे, युवकचे नरेश मस्के, सुरवसे यासह मोठ्या प्रमाणात त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.