Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट येथील   थोर सुफी संत हजरत शेख नुरुद्दीन चिष्ती रहि. दर्गाह ऊर्सनिमित्त कार्यक्रमाचें आयोजन

Admin by Admin
August 7, 2025
in सामाजिक
0
अक्कलकोट येथील   थोर सुफी संत हजरत शेख नुरुद्दीन चिष्ती रहि. दर्गाह ऊर्सनिमित्त कार्यक्रमाचें आयोजन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट येथील महान संत, सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान आणि थोर सुफी संत हजरत शेख नुरुद्दीन चिष्ती रहि. अल्लेही साहेबांचा वार्षिक ऊर्स शरीफ रविवार दिनां क. १० ऑगस्ट २०२५ सुरू होत असून पुढील प्रमाणे दिमाखात, आणि भक्तीमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात व भक्ती भावाने साजरा होणार आहे.
रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी संध्याकाळी ठीक १० वाजता सदर दर्गाहचे वंशपरंपरागत सज्जादानशीन, धर्मगुरू, मठाधीपती सय्यदशा नसीरपाशा सय्यदशा कदीरपाशा पीरजादे चिष्ती यांचे पवित्र हस्ते गुस्ल (अभिषेक) या धार्मिक विधीने ऊर्ससास सुरुवात होणार आहे.
दिनांक ११/०८/२०२५ रोजी संदलमलिक (गंध) चा कार्यक्रम असून संध्याकाळी ठीक ७ वाजता दर्गाहची परंपरागत गादी दर्गाहच्या समाखानात अंथरून सज्जादानशीन व फकीर फुकरा, भक्तगण यांचेसह संदलची भव्य मिरवणूक रजी अल्लः दर्गाह येथून निघून अक्कलकोट येथील मुख्य रस्त्यावरून दर्गाहवर रात्री १० वाजणेच्या आत पोहचणार आहे. त्यानंतर सदर दर्गाहचे सज्जादानशीन यांचे हस्ते हजरत शेख नुरुद्दीन बाबां यांचे समाधीवर संदल/गंध चढविण्यात येईल व त्यानंतरप्रसाद वाटप होणार आहे.
दिनांक १२/०८/२०२५ रोजी चिराग (दिपोस्तव) चा कार्यक्रम सदर दर्गाहचे सज्जादानशीन सय्यदशा नसीरपाशा सय्यदशा कदीरपाशा पीरजादे चिष्ती यांचे पवित्र हस्ते होणार आहे.
संध्याकाळी दर्गाहवर कव्वालीचा, भजनाचा बहारदार कार्यक्रम संपन्न होणार आहे.
दिनांक १३/०८/२०२५ रोजी सकाळी ठीक १० वाजता जियारतचा कार्यक्रम संपन्न होणार आहे व त्यानंतर सज्जादानशीन यांचे हस्ते प्रसाद वाटप होणार आहे. प्रसाद वाटपानंतर संध्याकाळी दर्गाहची परंपरागत गादी फातेहाखानी नंतर सज्जादानशीन यांचे दर्गाह येथील निवास्थानी नेऊन ठेऊन ऊर्स शरीफची सांगता होणार आहे.
तरी सर्व हिंदू, मुस्लीम बांधवांनी, भक्तांनी ऊर्सशरीफमध्ये भाग घेऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन या दर्गाहचे वंशज सज्जादानशीन सय्यदशा नसीरपाशा सय्यदशा कदीरपाशा पीरजादे चिष्ती यांचे बंधू जेष्ठ विधीज्ञ ऍड पिरजादे ए. के. ट्रस्टचे अध्यक्ष हाजी फजलेरहिमान शाब्दी ट्रस्टचे सेक्रेटरी जैनोदीन अशरफी यांनी केले आहे.
Previous Post

दलित पॅंथरच्या पश्चिम महाराष्ट्र संघटक पदी आबासाहेब तुकाराम ससाणे यांची निवड 

Next Post

सावित्रीबाई फुले विद्यापीठातील यूजीसी मान्यताप्राप्त यूपीएससी आणि एमपीएससी स्पेशल बॅच तत्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी

Admin

Admin

Next Post
सावित्रीबाई फुले विद्यापीठातील यूजीसी मान्यताप्राप्त यूपीएससी आणि एमपीएससी स्पेशल बॅच तत्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी

सावित्रीबाई फुले विद्यापीठातील यूजीसी मान्यताप्राप्त यूपीएससी आणि एमपीएससी स्पेशल बॅच तत्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157267
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697