Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सावित्रीबाई फुले विद्यापीठातील यूजीसी मान्यताप्राप्त यूपीएससी आणि एमपीएससी स्पेशल बॅच तत्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी

Admin by Admin
August 7, 2025
in महाराष्ट्र
0
सावित्रीबाई फुले विद्यापीठातील यूजीसी मान्यताप्राप्त यूपीएससी आणि एमपीएससी स्पेशल बॅच तत्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पुणे – ( प्रतिनिधी ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सीएससी विभागातील विद्यार्थी, राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस (एनएसयुआय), डीएपीएसए, आणि महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष विद्यार्थी आघाडी यांनी आज गुरुवारी कुलगुरूंना निवेदन देऊन यूजीसी मान्यताप्राप्त यूपीएससी आणि एमपीएससी स्पेशल बॅच तत्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली.
ही स्पेशल बॅच मागील दोन वर्षांपासून खंडित आहे. याआधी या बॅचमध्ये यूपीएससीसाठी ५२ जागा आणि एमपीएससीसाठी ५२ जागा उपलब्ध होत्या. या दोन्ही बॅचमधील प्रत्येकी ५२ जागांपैकी २० जागा अनुसूचित जाती (एससी) आणि १० जागा अनुसूचित जमाती ( एसटी) विद्यार्थ्यांसाठी राखीव होत्या.
विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले की, यावर्षी विद्यापीठाने जाहीर केलेल्या नव्या बॅचमध्ये फक्त ॲड-ऑन बॅच म्हणून यूपीएससीच्या ४० जागा आणि एमपीएससीच्या ४० जागा सुरू केल्या आहेत. त्यासाठी राखीव वर्गातील विद्यार्थ्यांकडून ₹७,५०० आणि ओपन वर्गातील विद्यार्थ्यांकडून तब्बल ₹३०,००० फी आकारली जात आहे. शिवाय या नव्या बॅचमध्ये एससी-एसटी राखीव जागा पूर्वीपेक्षा कमी करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांची ठाम मागणी आहे की, ॲड-ऑन बॅच सुरू ठेवावी, पण त्याचबरोबर मागील दोन वर्षांपासून बंद असलेली यूजीसी मान्यताप्राप्त मूळ स्पेशल बॅच — ज्यामध्ये यूपीएससीच्या ५२ जागा व एमपीएससीच्या ५२ जागा असून, त्यातील २० एससी आणि १० एसटी राखीव जागा कायम आहेत — ती पूर्ववत सुरू करावी.
चौकट – एससी,एसटी, ओबीसी आणि बहुजन विद्यार्थ्यांवरील अन्याय  कदापि सहन करणार नाही. यूजीसीच्या नियमानुसाच   युपीएससी, एमपीएससी च्या जागा भरावेत अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल
सागर सोनकांबळे ( डीएपीएसए विद्यार्थी नेते)
Previous Post

अक्कलकोट येथील   थोर सुफी संत हजरत शेख नुरुद्दीन चिष्ती रहि. दर्गाह ऊर्सनिमित्त कार्यक्रमाचें आयोजन

Next Post

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट

Admin

Admin

Next Post
महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157269
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697