सामाजिक

लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटच्या वतीने लायन्स पंधरवडा अंतर्गत  वृक्षारोपण संपन्न

अक्कलकोट ( प्रतिनिधी )

पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकत लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटच्या वतीने लायन्स पंधरवडा अंतर्गत एक भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमात अक्कलकोटातील नामवंत डॉक्टरांच्या हस्ते विविध प्रकारचे झाडे लावण्यात आली. या कार्यक्रमास एमजेएफ लायनेस डॉक्टर सहाराबेगम सलगरकर ,डॉक्टर राहुल लिंबीतोटे , डॉक्टर श्रीमती कोटी , डॉक्टर विक्रम पडवळकर ,डॉक्टर शिरत नावेद वळसंगकर , डॉक्टर आर व्ही पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. सदरचा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी पद्धतीने पार पडला. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार लाइन्स क्लब ऑफ अक्कलकोटचे अध्यक्ष लायन अभय खोबरे यांनी केले .या कार्यक्रमास लायन सचिव शिरीष पंडित , खजिनदार लायन विठ्ठल तेली, लायन शदिद वळसंगकर , लायन प्रकाश उन्नद , लायन शिवपुत्र हळगोदे , लायन सलगरकर , लायन मल्लिकार्जुन मसुती आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button