सामाजिक
अक्कलकोट तालुका क्रीडा संकुल भौतिक सुविधेस ३ कोटी रुपयाचा निधी प्राप्त

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट येथील एवन चौकातील फत्तेसिंह क्रिडांगणाच्या उर्वरित भौतिक विकास कामासाठी नव्याने तीन कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे. अक्कलकोट तालुका क्रीडा संकुल येथे यापूर्वी १ कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले होते
त्यामध्ये ४०० मीटर धावणमार्ग, बॅडमिंटन हॉल, विविध खेळाची क्रीडा साहित्य, पाण्याची बोअर
, सी.सी.टी.व्ही कॅमेरे, व विविध खेळाचे मैदाने, उदा : कबड्डी, खोखो, क्रीडांगणे तयार करण्यात आले होते आणि याचा वापर दररोज खेळाडू नागरिक घेत आहेत.आता
नविन शासन निर्णयानुसार तालुका क्रीडा संकुल योजना विकास निधी हा १ कोटी वरुन तब्बल ५ कोटी रुपये इतका
करण्यात आला आहे. त्यानुसार अक्कलकोट तालुक्यास त्यातील ३ कोटी निधीची मान्यता
शासनाकडून प्राप्त झाली आहे.यासाठी अक्कलकोट तालुक्याचे आमदार तथा तालुका क्रीडा संकुल समिती अक्कलकोटचे अध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्या सततचा पाठपुरावा आणि प्रयत्नातून ३ कोटीचा
निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये योग विज्ञान केंद्र , स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, अंतर्गत रस्ते, वॉकींग ट्रॅक,
४०० मीटर धावणे मार्ग, मैदान संपाटीकरण, तसेच विदयुतीकरण इत्यादी बाबींवर उपरोक्त निधीचा वापर
होणार आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हयामध्ये अक्कलकोट तालुका क्रीडा संकुल सर्व सोयीसुविधा युक्त असे संकुल होणार आहे.आणि याचा लाभ खेळाडू आणि नागरिक यांना होणार आहे.यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकार्य लाभल्याचे कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केले.
आमदार सचिन कल्याणशेट्टी –
अक्कलकोट शहरच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे जिल्ह्यातील सर्वात मोठे मैदान मागील तीस वर्षे दुर्लक्षित होते.या खेळाच्या स्पर्धेच्या युगात सर्व सोयीचे मैदान असणे गरजेचे आहे. त्यासाठी अथक प्रयत्न करून 3 कोटी प्राप्त झालेले आहेत. येत्या काळात आणखी नवीन सोयी सुविधा युक्त मैदान बनविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.




