राजकीय

हेमंत नंदू ओहोळ यांची वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहर ” उपाध्यक्ष” पदी नियुक्ती

पुणे ( प्रतिनिधी )नांदेड सिटी, सिंहगड रोड पुणे येथे राहणारे .हेमंत नंदू ओहोळ यांची वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहर ” उपाध्यक्ष” पदी नियुक्ती करण्यात आली आसुन त्यांच्या या निवडीचे स्वागत आणि अभिनंदन केले जात आहे.नुकतीच त्यांना पुणे शहर युवा अध्यक्ष मा.सागर भाऊ आल्हाट यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले आणि यानिमित्ताने त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार देखील करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन खडकवासला मतदारसंघ अध्यक्ष राजेंद्र कांबळे, महा सचिव गौतम तायडे यांनी केले होते.यावेळी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्ष किशोर रिकीबे, प्रसिद्ध प्रमुख संदीप चौधरी, पर्वती मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र गायकवाड तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

हेमंत नंदू ओहोळ यांना त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या असून, त्यांच्या या नियुक्तीमुळे पक्ष संघटनेला अधिक बळ मिळेल, आशा भावना यावेळी कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button