सामाजिक

राष्ट्रवीर संगोळी रायन्ना राज्याभिषेक वार्षिकोत्सवाची रासपकडून जय्यत तयारी

अक्कलकोट ( प्रतिनिधी ):- रविवार दिनांक २६ जानेवारी रोजी आद्यक्रांतीकारक राष्ट्रवीर संगोळी रायन्ना यांच्या नंदगड ता. खानापूर जिल्हा बेळगाव येथील त्यांच्या समाधीस्थळी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री  महादेव जानकर यांच्या सहित सहित देशभरातील विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे उत्तर कर्नाटक प्रभारी सुनिल बंडगर यांनी दिली आहे. 
दरवर्षीप्रमाणे नंदगड तालुका खानापूर जिल्हा बेळगाव येथे आद्य स्वातंत्र्यवीर तथा स्वराज्य नायक राष्ट्रवीर संगोळी रायन्ना १७ वा राज्याभिषेक वार्षिकोत्सवचे आयोजन राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय कार्यकारणी व कर्नाटक राज्य कार्यकारणी तर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर माजी मंत्री महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर, तर विशेष अतिथी म्हणून बेळगाव जिल्ह्यातील खानापूर विधानसभेचे आमदार विठ्ठल हलगेकर उपस्थित राहणार आहेत. तर सन्माननीय अतिथी म्हणून रासपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवलिंप्पा किन्नुर, राष्ट्रीय संघटक गोविंदराम शूरनर, बाळकृष्ण लेंगरे, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, के प्रसन्नाकुमार (केरळ), राष्ट्रीय खजिनदार मोहन माने, राष्ट्रीय सचिव एम.जी माणिशंकर (तमिळनाडू), हेमंत पंड्या (गुजरात), राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य चंद्रपाल (उत्तर प्रदेश), ईशान्य भारत प्रभारी डॉक्टर मनोज निगडकर, गुजरात राज्य प्रभारी सुशील शर्मा, कर्नाटक राज्य प्रभारी शिवनिंगप्पा जोगीन, कर्नाटक माजी प्रदेशाध्यक्ष धर्मण्णा तोंटपूर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते, बिहार राज्य प्रभारी गोपाल पाठक, मध्यप्रदेश प्रभारी प्राणसिंह पाल, मध्यप्रदेश राज्य अध्यक्ष श्रीलाल बघेल, आसाम प्रदेशाध्यक्ष गोपाल कहार, तेलंगणा प्रभारी रमाकांत करगटला, दिल्ली प्रभारी श्रीमती हेमलता पाल, उत्तर प्रदेश प्रभारी श्रीकांत गुरुजी, पश्चिम बंगाल प्रभारी महेश पॉल, मणिपूर संघटक प्रा. जॅक्शन खुमुकचम, तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष जी लायन राजा, मेघालय युवा प्रदेशाध्यक्ष अर्लो चिगन के संगमा, महाराष्ट्र प्रदेश मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, मध्य प्रदेश उपाध्यक्ष डी. एस. चव्हाण, मध्य प्रदेश महासचिव रामविलास कीरार, मध्य प्रदेश सचिव मोहरसिंह केवट, राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आघाडी अध्यक्ष नरेश वाल्मिकी,  सामाजिक नेते शंकर सोनळी,  जे के. रेझा, मुंबई  महिला आघाडी अध्यक्ष महक चौधरी, पत्रकार सुरेश दलाल, पत्रकार आप्पाजी पाटील, व अन्य प्रमुख पदाधिकारी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे उत्तर कर्नाटक प्रभारी सुनिल बंडगर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button