सामाजिक

तोळणूर गावचे दिव्यांग झी कन्नड सारेगमप गायक रेवणसिद्ध फुलारी  रुपेरी पडद्यावर झळकणार

अक्कलकोट – ( प्रतिनिधी )
तालुक्यातील कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील तोळणूर गावचे सुपुत्र दिव्यांग बाल गायक झी कन्नड सारेगमप सींगींग रियालिटी शोमध्ये अप्रतिम गायनाने सर्वांचे मन जिंकलेल्या रेवणसिद्ध फुलारी यांनी स्वतःचा अस्तित्व सिद्ध करत नवीन कन्नड चित्रपट “जनरींदा नानू मेले बंदे” चित्रपटात पार्श्वगायन ( प्लेबॅक सींगिग) द्वारे दोन अप्रतिम गाणे गायन करून आता कर्नाटक चित्रपट सृष्टीत रुपेरी पडद्यावर झळकणार असून सर्वत्र कौतुक होत आहे.
 कर्नाटक राज्यातील नंबर वन सिंगिग रियालिटी शो झी कन्नड  सारेगमप फायनालिस्ट तोळणूर (ता.अक्कलकोट)चे सुपुत्र रेवणसिद्ध फुलारी नुकतेच आर.टी.नगर  बेंगळुरू येथे नवीन कन्नड चित्रपट “जनरींदा नानू मेले बंदे” या नवीन चित्रपटातील दोन गाणे गायन करून  पार्श्वगायक म्हणून रुपेरी पडद्यावर प्रवेश केला आहे.  
 चित्रपट  नवीलुगरी नवीन  दिग्दर्शन केले असून निर्मापक म्हणून  हेमावती काम पाहत असून  संगीत दिग्दर्शक प्रणव सतीश यांनी संगीत संयोजन केले आहे. चित्रपट निर्मितीसाठी विशाला सतीश, गंधर्व राज आणि शिवन्ना परिश्रम घेत आहे.
  मागील दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्यातील पहिला दीव्यांग बाल गायक कोणताही संगीत पार्श्वभूमी नसताना स्वतः प्रयत्न करून झी कन्नड सारेगमप मध्ये टॉप फोर मध्ये स्थान पटकावून नंतरचा काळात देहली,मुबई,पुणे,चैन्नई,केरळ,आंध्रप्रदेश,तामिळनाडू,गोवा आदी राज्यात आणि कर्नाटकातील सर्व जिल्ह्यात संगीत शोमध्ये संगीत कार्यक्रम दिले आहे.कर्नाटक राज्यातील तसेच देशातील दिग्गज संगीत कलाकारांकडून गायन,तबलावादन,हार्मोनियम, कॅशिओ,पॅड वादन मध्ये वाहवा मिळविला आहे.आता डायरेक्ट प्लेबॅक सिंगिगसाठी रुपेरी पडद्यावर  संधी मिळाल्याने सीमावर्ती भागातील कन्नड – मराठी भाषिक संगीत प्रेमी आणि सोलापूर जिल्हा तसेच कर्नाटक राज्याला लागून असलेल्या केरळ,गोवा,महाराष्ट्र,आंध्रप्रदेश,तामिळनाडू राज्यातील सीमावर्ती कन्नड भाषिक,विविध क्षेत्रातील मान्यवर अभिनंदन करून पुढील संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यासाठी शुभेच्छा देत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button