भोकर कडकडीत बंद ,सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करा , भोकरच्या संतप्त कार्यकर्त्यांची मागणी

भोकर / नांदेड (हमीदखॉ पठाण )
परभणी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तकेची विटंबना केल्याप्रकरणी निषेध आंदोलन करणाऱ्या युवकास पोलिसांनी बेदम मारहाण केली त्यामध्ये १५ डिसेंबर रोजी सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू झाला . युवकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलिसावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात भोकरच्या संतप्त कार्यकर्त्यांनी केली आहे . या गंभीर घटनेच्या निषेधार्थ दि.१६ डिसेंबर रोजी भोकर बंद ला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला .
सोमनाथ सुर्यवंशी या युवकास पोलिसांनी
मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी सकाळ पासूनचं शहरात सर्व दुकाने , हॉटेल , भाजीपाला सर्व प्रतिष्ठाने कडकडीत बंद होती .तहसिल कार्यालयासमोर दुपारी १ वाजता निषेध सभा घेण्यात आली, शहिद सोमनाथ सुर्यवंशी अमर रहे अशा घोषणा देवून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली . फुले , शाहू , आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात संविधानाची विटंबना होत आहे, काही ठिकाणी अप्रिय घटना घडत आहेत, अत्याचाराचे प्रमाण देखील वाढत आहे ही गंभीर बाब असून परभणी येथील घटनेचा निषेध करून मारहाण करणाऱ्या दोषीवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आपल्या मनोगतामध्ये अनेकांनी व्यक्त केली . ॲड . सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिस मारहाणीत मृत्यू झाल्याने मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा , मयत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या वारसांना ५० लाखाची मदत देवून त्याच्या कुंटुंबातील व्यक्तीस शासकीय नौकरी देण्यात यावी , संविधान विटंबना करणाऱ्या समाज कंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा , परभणी येथील आंदोलन कर्त्यांवरील गुन्हे मागे घेवून त्यांची सुटका करावी आदी मागण्यांचे निवेदन तहसिलदार विनोद गुंडमवार यांना देण्यात आले . या आंदोलनात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते एल.ए.हिरे,मा.सभापती गोविंद बाबा गौड.बहुजन नेते नागनाथ घिसेवाड,माधव अमृतवाड, वंचितचे दिलीप राव, निळकंठ वर्षेवार,उत्तम कांबळे,तोसिफ हमीद खान पठाण रमेश गंगासागरे भीमराव दुधारे,बाबाखान,डॉ.मनोज गिमेकर,दत्ताभाऊ डोंगरे, मिलिंद गायकवाड, सुलोचना ढोले,सूनील कांबळे, विक्रम क्षिरसागर,जयभीम पाटील, देवा हटकर, सुरेखा माळे , सिद्धार्थ जाधव,आनंदीबाई चुनगुरवाड , राहुल कदम, जुनेद पटेल , के.वाय . देवकांबळे,प्रतिक कदम,माणिक जाधव,आशीत सोनुले ,निखिल हंकारे, कपिल कांबळे , आदीसह विविध संघटनाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .