Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

मराठवाडा जनविकास संघाचे आठ टँकर पुरविणार पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पिण्याचे पाणी

Admin by Admin
June 20, 2025
in महाराष्ट्र
0
मराठवाडा जनविकास संघाचे आठ टँकर पुरविणार पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पिण्याचे पाणी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

संत महंतांच्या हस्ते पूजन करून टँकर वारकऱ्यांच्या सेवेत दाखल

पिंपरी चिंचवड ( अशोक शिवशरण )संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना मोफत पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने आठ टॅंकर पालखी सोहळ्यासोबत पाठविण्यात येत आहेत. संत महंतांच्या हस्ते टँकरचे पूजन करून ते वारकऱ्यांच्या सेवेत दाखल करण्यात आले. वारीसाठी विशेष सहकार्य विजय भोसले , गणेश शेलार यांनी मोलाचे योगदान दिले
या टँकरद्वारे आळंदी ते पंढरपूर दिंडी क्र.११ ह.भ.प.सोपान काका कराडकर, दिंडी क्र.18 कै. ह.भ.प. धोंडूजी बुवा चिझघरकर, देहू ते पंढरपूर दिंडी क्र.२२१ ह.भ.प.रामकृष्ण प्रासादिक, दिंडी क्र. ९ ह. भ. प. भागवत महाराज बोळेगावकर, दिंडी क्र. ३८७ स्वयंभू श्री राम प्रभू, दिंडी क्र. २ श्री देहूकर सांप्रदायिक दिंडी समाज, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, दिंडी क्र.१९७ ह.भ.प. बाबुराव महाराज तांदळे आदी दिंड्यासोबत पिण्याच्या पाण्याचे टँकर वारकऱ्यांच्या सेवेसाठी पंढरपूरपर्यंत पाठविण्यात येत आहेत.
पिंपळे गुरव येथे झालेल्या कार्यक्रमास भंडारा डोंगर ट्रस्टचे सदस्य ह.भ.प.जगन्नाथ नाटक पाटील, ह.भ.प. बब्रुवान वाघ महाराज, ह.भ.प. तुकाराम भाऊ महाराज, ह.भ.प. बाबुराव तांदळे महाराज, ह.भ.प. गजानन वाव्हळ महाराज, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे शहराध्यक्ष विजय अण्णा जगताप, ह.भ.प. धारूमामा बालवडकर, समाज प्रबोधनकार शारदाताई मुंडे, निवृत्त कॅप्टन युवराज माने, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार उपस्थित होते.
ह.भ.प. बब्रुवान वाघ महाराज म्हणाले, की मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या सेवेसाठी अरुण पवार करत आलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांनी लावलेले हजारो वृक्ष डौलाने उभे आहेत. समाजातील उपेक्षित घटकांना नेहमीच मदत करत आलेले आहेत. निःस्वार्थी भावनेने वारकऱ्यांची सेवा दरवर्षी करीत आले आहेत.
शारदाताई मुंडे म्हणाल्या, की अरुण पवार हे निस्वार्थीपणे गरजू विद्यार्थी, अंध -अपंग विद्यार्थी, वारकरी सेवा, मुक्या प्राण्यांची सेवा, तसेच वृक्ष लागवडीचे सेवाकार्य करत आहेत. वारीमध्ये आळंदी ते पंढरपूर संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात गेली १० वर्षे मोफत पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून देत आहेत, हे स्तुत्य आहे.
अरुण पवार म्हणाले, पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंडीतील वारकऱ्यांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून ट्रस्टतर्फे टँकर सुविधा उपलब्ध करून दिली जाते. हीच पांडुरंगचरणी आमची सेवा आहे.
कॅप्टन बालाजी पांचाळ, अनिताताई पांचाळ, हास्य क्लबचे संस्थापक ऍड. प्रतापराव साबळे, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण फिरके, भीष्माचार्य जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण खडसे, भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य राजाभाऊ लदे, मधुकर रणपिसे, अमरसिंग आदियाल, तानाजी जवळकर, श्यामभाऊ जगताप, नितीन कदम, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. विलास बालवडकर, अशोक ढोरे पाटील, सूर्यकांत ढोरे, ह.भ.प. बाळासाहेब शितोळे, यशवंत जगताप, दिनेश पवार, योग शिक्षिका मीनाक्षी खैरनार, सायना अन्सारी, संजय ढोरे, सेंद्रीय शेती सूर्यवंशी मामा, वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष सौरभ शिंदे, बळीराम माळी, शशिकांत कुलकर्णी, प्रभाकर साळुंखे, धनराज तायडे, ह.भ.प. तुकाराम महाराज बिरादार, राजू रेड्डी, संतोष दर्जी, महाळाप्पा मेहेत्रे, उमाकांत तळवडे, अशोक पाटील, उदय ववले, गौतम डोळस, श्रीधर फौजीदार, वामन कड, महादेव रोकडे, राजेंद्र कर्नावत, गोविंद तांबवडे, सुग्रीव पाटील, किशोर आटवेकर, अण्णा मोरे, शंकर तांबे, दिलीपराव देशमुख, बाळासाहेब साळुंके, संतोष भोरे , सुदिक्षा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा उमा विश्वनाथन, विजयराज नागरी पतसंस्थेचे संचालक सूर्यकांत कुरूलकर, युवराज नलावडे, वामन भरगंडे, सकाराम वालकोळी, सोमेश्वर झुमके, मराठवाडा जनविकास संघाचे पदाधिकारी, दिंडी प्रमुख, चालक, मालक व वारकरी सांप्रदायिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

वंचित बहुजन युवा आघाडीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी .दिपसागर उर्फ पंकज पाराध्ये , जिल्हा उपाध्यक्ष पदी.प्रकाश शिंदे यांची निवड 

Next Post

जनतेच्या हितासाठी कटिबद्ध राहीन” – मल्लिकार्जुन पाटील यांची वागदरीत ग्वाही

Admin

Admin

Next Post
जनतेच्या हितासाठी कटिबद्ध राहीन” – मल्लिकार्जुन पाटील यांची वागदरीत ग्वाही

जनतेच्या हितासाठी कटिबद्ध राहीन" – मल्लिकार्जुन पाटील यांची वागदरीत ग्वाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157102
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697